शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

लंकेला धूळ चारत पाकिस्तान सेमीफायनलमध्ये

By admin | Updated: June 12, 2017 23:04 IST

करो या मरोच्या लढतीत पाकिस्तानने श्रीलंकेचा सात विकेटने पराभव करत सामीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. स्रफराज अहमदने कर्णधाराला साजेशी खेळी करताना संयमी अर्धशतक केले.

ऑनाइन लोकमतलंडन, दि. 12 - करो या मरोच्या लढतीत पाकिस्तानने श्रीलंकेचा सात विकेटने पराभव करत सामीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. स्रफराज अहमदने कर्णधाराला साजेशी खेळी करताना संयमी अर्धशतक केले. पाकिस्तान नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फंलदाजीस आमंत्रीत केले होते. प्रथम फलंदाजी करताना 49. 2 षटकांत सर्वबाद 236 धावा केल्या होत्या. श्रीलंकेनं दिलेलं 237 धावांच्या लक्ष्याच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्ताननं फकर झमन आणि कर्णधार सर्फराजच्या अर्धशतकाच्या बळावर हे आव्हान तीन गाडी राखून 45 व्या षटकांत पार केलं. सामन्याच्या सुरुवातीला काहीशी ढिली झालेली पकड पाकिस्तानच्या फलंदाजांनी पुन्हा मिळवली आहे. फकर झमनने 50 धावांची महत्वपुर्ण खेळी केली. तर कर्णधार सर्फराजने 57 धावांची खेळी करत विजयात मोलाचे योगदान दिले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर फार मोकळीक मिळाली नाही. अखेर श्रीलंकेला 49.2 षटकांत सर्व बाद 236 धावांपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. धनुष्का गुणतिलकाच्या (13) रूपात त्यांना पहिला धक्का बसला. मात्र चिवट अर्धशतकी खेळी करणाऱ्या निरोशन डिकवेलाने कुशल मेंडिससोबत (27) 56 आणि अँजेलो मॅथ्यूजसोबत 78 धावांची भागीदारी करत लंकेला 3 बाद 161 असे सुस्थितीत नेले. पण मॅथ्यूज (39) आणि डिकवेला (73) बाद झाल्यावर श्रीलंकेडा डाव गडगडला. धनंजय डिसिल्व्हा (1) आणि थिसारा परेरा हेही बाद झाल्याने श्रीलंकेची अवस्था 7 बाद 167 असी झाली होती. अशा परिस्थितीत तळाच्या सुरंगा लकमल (26), धनुष गुणरत्ने ( 27 ) आणि यांनी छोट्या पण उपयुक्त खेळी करत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. पाकिस्तानकडून हसन अली आणि जुनैद खान यांनी प्रत्येकी तीन तर मोहम्मद आमीर आणि फहिमने प्रत्येकी दोन गडी बाद केले.