शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत पेस-बोपण्णा समोरासमोर

By admin | Updated: September 9, 2015 02:36 IST

रोहन बोपण्णा आणि लिएंडर पेस आपापल्या सहकाऱ्यांसह अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत एकमेकांविरुद्ध झुंजणार आहे. या लढतीच्या निमित्ताने भारतीय

न्यूयॉर्क : रोहन बोपण्णा आणि लिएंडर पेस आपापल्या सहकाऱ्यांसह अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत एकमेकांविरुद्ध झुंजणार आहे. या लढतीच्या निमित्ताने भारतीय टेनिस चाहत्यांना रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळणार आहे.चौथे मानांकन प्राप्त पेस व मार्टिना हिंगीस यांनी अंतिम चारमध्ये स्थान निश्चित केले. त्यांना रोमानियाच्या सिमोना हालेप व होरिया तेकाऊ या जोडीविरुद्ध पुढे चाल मिळाली. बोपण्णा व चिनी ताइपेची त्याची सहकारी युंग जान चान या दुसरे मानांकन प्राप्त जोडीने संघर्षपूर्ण लढतीत चिनी ताइपेच्या सू वेई सियेह व फिनलँडच्या हेन्री कोंटिनेन यांचा ७-६, ५-७, १३-११ ने पराभव केला. सहावे मानांकन प्राप्त जोडीने सहा एस लगावले, तर प्रतिस्पर्धी जोडीला केवळ तीन एस लगावता आले. बोपण्णा-मर्जिया जोडीला यानंतर डोमिनिक इंग्लोट-रॉबर्ट लिंडस्टेट या जोडीच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. ज्युनिअर मुलींच्या विभागात भारताच्या क रमन कौर थांडीने जर्मनीच्या कॅथरिना होबगार्स्कीचा ६-३, ७-६ ने पराभव करीत दुसरी फेरी गाठली. दुसऱ्या फेरीत करमनला रशियाच्या एवजिनिया लेवाशोव्हाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. १५ वे मानांकन प्राप्त प्रांजला यादलापल्लीला पहिल्या फेरीत यूनानच्या वालेंटिनीने ७-६, ६-३ ने पराभूत केले. (वृत्तसंस्था)बोपण्णा व फ्लोरिन मर्जिया या जोडीने पुरुष दुहेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी कॅ नडाच्या डेनियल नेस्टर व फ्रान्सच्या एडुअर्ड रोजर व्हेसलिन या जोडीचा ६-७, ६-४, ६-३ ने पराभव करीत अंतिम आठमध्ये स्थान निश्चित केले.