शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

...तरच खेळाडूला विश्रांती : महेंद्रसिंह धोनी

By admin | Updated: March 13, 2015 00:52 IST

खेळाडू मोठ्या कालावधीपासून खेळत असले आणि संघाने उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले असले, तरीही एखादा खेळाडू जखमी झाल्यासच शनिवारी झिम्बाब्वेविरुद्ध

आॅकलंड : खेळाडू मोठ्या कालावधीपासून खेळत असले आणि संघाने उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले असले, तरीही एखादा खेळाडू जखमी झाल्यासच शनिवारी झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या विश्वचषक सामन्यात अंतिम ११ जणांत बदल केला जाईल, असे मत व्यक्त केले आहे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने.धोनीचा संघात जास्त बदल न करण्याचा दृष्टिकोन असल्यास अम्बाती रायुडू, अक्षर पटेल, स्टुअर्ट बिन्नी आणि भुवनेश्वर कुमार यांना अंतिम ११ जणांत स्थान मिळवणे कठीण होईल.यांतील भुवनेश्वरने मोहंमद शमीच्या अनुपस्थितीत एक सामना खेळला होता. उमेश यादव, शमी आणि मोहित शर्मा या तेजतर्रार त्रिकुटाने भुवनेश्वरची उणीव भासू दिली नाही. त्याचप्रमाणे, संघातील नियमित खेळाडूला विश्रांती देण्याच्या मूडमध्ये आपण नसल्याचेही धोनीने स्पष्ट केले आहे. धोनीने पर्थमध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यानंतर जे खेळाडू अंतिम ११ जणांच्या बाहेर आहेत ते बाहेरच असतील, असे स्पष्ट शब्दांत म्हटले होते.हॅमिल्टनमध्ये आयर्लंडविरुद्ध सामन्यानंतर भारतीय कर्णधाराने तर औपचारिक सामन्याच्या शब्दप्रयोगास विरोध का आहे, हेदेखील विस्ताराने स्पष्ट केले होते. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात काही खेळाडूंना विश्रांती दिली जाईल का, असे त्याला विचारण्यात आले तेव्हा धोनी म्हणाला, ‘‘आम्हाला यासंबंधी फिजिओकडून माहिती घेण्याची आवश्यकता भासेल. जर फिजिओला वाटले, की अन्य खेळाडू जखमी होऊ शकतो, तर तशा परिस्थितीत आम्ही त्या खेळाडूला विश्रांती देऊ. अन्यथा, एखादा खेळाडू तंदुरुस्त आहे व निवडीसाठी उपलब्ध असेल, तर आम्ही आमचा सर्वोत्तम ११ जणांचा संघ मैदानात उतरवू. त्याचप्रमाणे सामन्यादरम्यान विश्रांतीसाठी खेळाडूंना खूप कालावधी मिळाला आणि एवढी विश्रांती पुरेशी आहे. दुखापतीचा धोका नसल्यास आम्ही आमचा सर्वोत्तम संघ खेळवू.’’हॅमिल्टनच्या सेडन पार्कची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक होती; परंतु धोनीला ईडन पार्कच्या खेळपट्टीवर चांगली उसळी मिळेल, अशी आशा आहे. (वृत्तसंस्था)