शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खराडी संघाचा एकतर्फी विजय

By admin | Updated: June 8, 2015 00:28 IST

एस. व्ही. दामले चषक १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत धीरज फटांगरेच्या (४१ धावा व २ बळी) भेदक गोलंदाजीच्या जोरावर खराडी जिमखाना संघाने पीवायसी-बी संघाचा ८९ धावांनी धुव्वा उडविला.

पुणे : एस. व्ही. दामले चषक १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत धीरज फटांगरेच्या (४१ धावा व २ बळी) भेदक गोलंदाजीच्या जोरावर खराडी जिमखाना संघाने पीवायसी-बी संघाचा ८९ धावांनी धुव्वा उडविला. टष्ट्वेन्टी-टू यार्ड संघाने पीसीए संघाचा, तर स्टेडियम क्रिकेट क्लबने पीवायसी-ए संघाचा पराभव केला. क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर झालेल्यायासामन्यात खराडीने प्रथम फलंदाजी करताना १७ षटकांत ६ बाद १६६ धावांचे भक्कम आव्हान उभारले. पारस गवळी (३२), हेमंत पवार (२१), धीरज फटांगरे (४१), अतुल विटकर (३१), मंजुनाथ मोक्की (२८) यांच्या खेळीने संघाने आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात आली. शुभंकर हर्डीकर याने १२ धावांत ४ बळी घेत खराडीच्या फलंदाजीला खिंडार पाडले. मात्र इतर गोलंदाज धोवा रोखण्यात अपयशी ठरले. पीवायसी-बी संघाला खराडीने १७ षटकांत ८ बाद ७७ धावांतच रोखले. शुभंकर हर्डीकर याने फलंदाजीतही चमक दाखवत नाबाद २३ धावांची खेळी करीत एकाकी झुंज दिली. अक्षय काळोखे याने ३, शुभम माळवदे व धीरज फटांगरे यांनी प्रत्येकी २ बळी घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अन्य एका सामन्यात ट्वेंटी-टू यार्ड संघाने गोलंदाजांच्या अचूक कामगिरीच्या जोरावर पीसीए संघाला ६ विकेट्सने धूळ चारली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पीसीए संघाला संघाला ६ बाद ११४ धावांवर रोखले. हार्दिक अदक, अजिंय चौगुले आणि जावेद अन्सारी यांनी अचूक माऱ्यासह प्रत्येकी एक बळी घेत पीसीएला मर्यादित धावसंख्येत रोखले. मिहिर डांगे (१८), प्रणव कुंभार (३२) आणी परिक्षित बांदक (२८) यांनी संघाला सावरले.यानंतर धावांचा पाठलाग करताना ट्वेंटी टू यार्ड संघाने सहजपणे फटकेबाजी करताना केवळ ४ फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष गाठताना विजयी कूच केली. निनाद चौगुले (४८) आणि मुकेश चौधरी (३०) यांनी दमदार फटकेबाजी करताना पीसीएच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले. त्याचवेळी प्रण व मिहिर यांनी गोलंदाजीत देखील चमक दाखवताना प्रत्येकी एक बळी घेत ट्वेन्टी टू यार्डला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला. (क्रीडा प्रतिनिधी)