Novak Djyokovich : 'लसीकरण सक्तीचं नसावं, लस न घेण्याची सर्वोतोपरी किंमत मोजण्यास तयार'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 15:39 IST2022-02-18T15:37:59+5:302022-02-18T15:39:03+5:30
जोकोविचने आत्तापर्यंत 20 ग्रँडस्लॅम खिताब जिंकले आहेत. यावर्षी झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेपर्यंत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्यात रोजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यासमवेत जोकोविच टॉपमध्ये होता.

Novak Djyokovich : 'लसीकरण सक्तीचं नसावं, लस न घेण्याची सर्वोतोपरी किंमत मोजण्यास तयार'
जगातील नंबर 1 चा टेनिसपटू असलेल्या नोवाक जोकोविचने एक मुलाखतीमध्ये लसीकरणासंदर्भात मोठं विधान केलं. काहीही झालं तरी मी लस घेणार नाही. कारण, लसीकरण हा ऐच्छिक विषय असावा, तो सक्तीचा असू नये, असे जोकोविचने म्हटले. आपल्या या निर्णयामुळे येणाऱ्या प्रत्येक अडचणीची जी किंमत चुकवावी लागेल, ती चुकविण्यास आपण तयार असल्याचंही त्याने म्हटले.
मी कोरोना व्हॅक्सीनचा विरोध करत नाही. मात्र, लस घेणे अथवा न घेणे हा ऐच्छिक विषय असावा. तो कुणावरही लादता कामा नये. जर, लस न घेण्याची किंमत विम्बल्डन आणि फ्रेच ओपन यांसारख्या स्पर्धा असतील तर ती किंमत चुकविण्यास मी तयार आहे, असेही जोकोविचने म्हटले. माझे निर्णय हे माझ्या सिद्धांताशी जोडलेले आहेत. माझ्यासाठी माझे शरीर कुठल्याही टायटलपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. मी कधीही लसीकरणाच्या विरोधात राहिलो नाही. पण, या निर्णयाच्या स्वातंत्रतेचं मी समर्थन करतो की, एखादी वस्तू आपल्या शरीरात टाकायची आहे किंवा नाही. जोकोविचने बीबीसी न्यूजशी बोलताना स्पष्टपणे आपलं मत मांडलं.
दरम्यान, जोकोविचने आत्तापर्यंत 20 ग्रँडस्लॅम खिताब जिंकले आहेत. यावर्षी झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेपर्यंत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्यात रोजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यासमवेत जोकोविच टॉपमध्ये होता.