शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही

By admin | Updated: October 12, 2015 23:49 IST

महान खेळाडू पेले यांनी, फुटबॉल खेळाची सर्वोच्च संघटना फिफाचा प्रमुख बनण्याचा कोणताही इरादा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

कोलकाता : महान खेळाडू पेले यांनी, फुटबॉल खेळाची सर्वोच्च संघटना फिफाचा प्रमुख बनण्याचा कोणताही इरादा नसल्याचे स्पष्ट केले आहे. फिफा अजूनही भ्रष्टाचाराच्या आरोपाशी संघर्ष करीत आहे. त्यामुळे त्याचे अध्यक्ष सेप ब्लाटर आणि यूएफ प्रमुख मायकल प्लाटिनी यांना निलंबित करण्यात आले आहे.पेले एका आठवड्याच्या भारतीय दौऱ्यावर आले आहेत. तीनदा वर्ल्डकप विजेत्या संघाचे प्रतिनिधित्व करणारे पेले यांनी माझा फिफा अध्यक्ष बनण्याचा कोणताही इरादा नसल्याचे सांगितले.या वर्षी फिफावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. फिफात मुळापर्यंत भ्रष्टाचार पोहोचला आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने त्यांच्या काही शीर्ष पदाधिकाऱ्यांची तुरुंगात रवानगी केली आहे आणि नंतर फिफाच्या नैतिक समितीने ब्लाटर व प्लाटिनी यांना निलंबित केले आहे.पेले म्हणाले, ‘‘वेगवेगळ्या पिढ्यांतील फुटबॉलपटूंची तुलना करणे कठीण असते; परंतु गेल्या दहा वर्षांत मेस्सी हा सर्वोत्तम आहे. रोनाल्डोदेखील पुढे येऊन गोल करण्याचा प्रयत्न करतो; परंतु मेस्सी वेगळ्या शैलीचा खेळाडू आहे. मी माझ्या संघात दोघांनाही ठेवले असते. नेमारचेदेखील भविष्य उज्ज्वल आहे.’’ या ७४ वर्षीय दिग्गजाने खेळात खूप स्पर्धा वाढल्याचे मान्य केले. तथापि, आताही आपण खेळलो तर तेवढेच यशस्वी ठरलो असतो, असे स्पष्ट केले.(वृत्तसंस्था)