शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंडसाठी आज सोपी लढत

By admin | Updated: February 17, 2015 00:44 IST

विश्वकप स्पर्धेत जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जात असलेल्या सह-यजमान न्यूझीलंड संघाला मंगळवारी साखळी फेरीत स्कॉटलंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

ड्युनेडिन : विश्वकप स्पर्धेत जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जात असलेल्या सह-यजमान न्यूझीलंड संघाला मंगळवारी साखळी फेरीत स्कॉटलंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सलामी लढतीत श्रीलंकेचा ९८ धावांनी पराभव करणाऱ्या न्यूझीलंड संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे, तर आठ वर्षांच्या कालावधीनंतर विश्वकप स्पर्धेत सहभागी होत असलेला स्कॉटलंड संघ या स्पर्धेत छाप सोडण्यास उत्सुक आहे. उभय संघांसाठी गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये खेळली गेलेली लढत संस्मरणीय ठरली होती. त्या लढतीत न्यूझीलंडने स्कॉटलंडविरुद्ध एका धावेने निसटता विजय मिळविला होता. स्कॉटलंडचा कर्णधार प्रेस्टन मोमसेनने त्या लढतीच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, ‘मी अखेरच्या चेंडूवर धावबाद झाल्यामुळे आमचे विजय मिळविण्याचे स्वप्न भंगले. आम्ही सोमवारी सकाळी त्या लढतीचे व्हिडीओ फुटेज बघितले आणि त्यामुळे आमचे मनोधैर्य उंचावण्यास मदत झाली. आम्ही त्या लढतीत विजय मिळविण्यास उत्सुक होतो; पण निसटत्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.’दुसऱ्या बाजूचा विचार करता न्यूझीलंड संघ स्कॉटलंडचे आव्हान पेलण्यास सज्ज आहे. न्यूझीलंडचे प्रशिक्षक माईक हेसन यांनी कुठल्याही प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखण्याची चूक करणार नसल्याचे म्हटले आहे. हेसन म्हणाले, ‘या स्पर्धेत कुठल्याही संघाने प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखण्याची चूक केली तर धक्कादायक निकाल नोंदविला जाण्याची शक्यता आहे. अन्य संघांप्रमाणे आम्ही स्कॉटलंड संघाचाही आदर करतो.’स्कॉटलंड संघ विश्वकप स्पर्धेत छाप सोडण्यास उत्सुक आहे. आयर्लंडविरुद्ध सराव सामन्यात वेगवान गोलंदाज एलस्डेयर इव्हान्स आणि आॅफस्पिनर माजिद हक यांनी एकूण ७ बळी घेतले होते. याव्यतिरिक्त फॉर्मात असलेला माजी कर्णधार कायले कोएत्जर व सलामीवीर कॅलम मॅकलॉयड यांच्याकडून स्कॉटलंड संघाला चमकदार कामगिरीची आशा आहे. न्यूझीलंडतर्फे सलामी लढतीत रॉस टेलरचा अपवाद वगळता आघाडीच्या सर्वंच फलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. टेलरने त्या लढतीत ४९ चेंडूंना सामोरे जाताना केवळ १४ धावा केल्या होत्या. स्कॉटलंडविरुद्धच्या लढतीत न्यूझीलंडला टेलरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त ग्रँट इलियट आपली निवड सार्थ ठरविण्यास उत्सुक आहे. स्कॉटलंड संघ तिसऱ्यांदा विश्वकप स्पर्धेत सहभागी होत आहे. यापूर्वी १९९९ व २००७ मध्ये स्कॉटलंड संघाने आठ सामने खेळले; पण त्यांना एकाही लढतीत विजय मिळविता आला नाही. न्यूझीलंड संघाची देशाच्या दक्षिण भागात खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये कामगिरी उल्लेखनीय ठरते. २०११ मध्ये क्राईस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत न्यूझीलंडला पाकिस्ताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. (वृत्तसंस्था)न्यूझीलंड : बेंडन मॅक्युलम (कर्णधार), कोरी अ‍ॅण्डरसन, ट्रेंट बाउल्ट, ग्रांट एलिओट, मार्टिन गुप्टील, टॉम लॅथम, मिशेल मॅकक्लेनघन, नॅथन मॅक्युलम, कायल मिल्स, अ‍ॅडम मिल्ने, लुक रोंची (यष्टीरक्षक), टिम साऊथी, रॉस टेलर, डॅनिएल व्हिटोरी, केन विलियमन्सनस्कॉटलंड : प्रेस्टन मोम्मसेन (कर्णधार), कायले कोएत्झर (उपकर्णधार), रिची बेरींग्टन, फ्रेडी कोलमन, मॅथ्यूज क्रॉस (यष्टीरक्षक), जोश डॅवेय, अलास्डेर एवान्स, हामिश गार्डीनेर, माजीद हक, मिचल लीस्क, मॅट मॅचान, कॅलूम मॅकलीओड, साफयान शरिफ, रॉब टेलर, लेन वार्डलॉ