शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जनांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंडवर पराभवाचे सावट

By admin | Updated: November 29, 2015 01:35 IST

फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे आॅस्ट्रेलियाविरुद्ध डे-नाईट तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंड संघ पराभवाच्या छायेत अडकला. पहिल्या डावात २२ धावांनी

अ‍ॅडिलेड : फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे आॅस्ट्रेलियाविरुद्ध डे-नाईट तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंड संघ पराभवाच्या छायेत अडकला. पहिल्या डावात २२ धावांनी माघारल्यानंतर खेळ संपेपर्यंत ११६ धावांत अर्धा संघ गमविणाऱ्या न्यूझीलंडकडे एकूण आघाडी केवळ ९४ धावांची असून पाच फलंदाज शिल्लक असल्याने तिसऱ्या दिवसअखेर सामन्याचा निकाल लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली.बीजे वाटलिंग ७ आणि मिशेल सेंटनर १३ हे नाबाद होते. गुलाबी चेंडू पुन्हा एकदा फलंदाजांवर वरचढ ठरला. जोश हेजलवुड याने विद्युत प्रकाशझोताचा लाभ घेत दोन्ही सलामीवीरांना तंबूची वाट दाखविली. मार्टिन गुप्तिल १७ याने मिशेल मार्शकडे झेल दिला, तर टॉम लेथम (१०) यष्टीमागे झेलबाद झाला. केन विलियम्सन याला हेजलवुडच्या चेंडूवर जीवदान मिळाले, पण तो लाभ घेण्यात अपयशी ठरला. मार्शच्या चेंडूवर यष्टिरक्षक पीटर नेव्हिले याने त्याला झेलबाद केले. कर्णधार ब्रँडन मॅक्यूलम २० याला मार्शने पायचित केले. पर्थमध्ये द्विशतक ठोकणारा रॉस टेलर ३२ याला हेजलवुडने तंबूची वाट दाखविली.त्याआधी आॅस्ट्रेलियाचा डाव २२४ धावांत संपल्याने २२ धावांची आघाडी घेता आली. एकवेळ ११८ धावांत संघाचे आठ फलंदाज तंबूत परतले होते, पण नाथन लियॉन याला हॉट स्पॉटमध्ये पंचाने नाबाद ठरविले. लियॉनने याचा लाभ घेत नेव्हिलेसोबत नवव्या गड्यासाठी ७४ धावांची भागीदारी केली.लियॉनने ३४ धावांचे योगदान दिले.पायाला फ्रॅक्चर झाल्यानंतरही अखेरच्या स्थानावर फलंदाजीला आलेल्या स्टार्कने लागोपाठ दोन षट्कार हाणले. तो २४ धावा काढून नाबाद राहिला. नेव्हिलेने सर्वोच्च ६६ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून डग ब्रेसवेल याने १८ धावांत तीन आणि ट्रेंट बोल्ट व क्रेग यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. (वृत्तसंस्था)धा व फ ल कन्यूझीलंड पहिला डाव २०२. आॅस्ट्रेलिया पहिला डाव : ब्रुन्स त्रि. गो. ब्रॅकवेल १४, डेव्हीड वॉर्नर झे. साऊथी गो. बोल्ट १, स्मिथ झे. वॉल्टींग गो. क्रेग ५३, वोगस झे. गुप्टील गो. साऊथी १३, एस. ई. मार्श धावबाद (मॅक्युलम) २, एम. आर. मार्श झे. वॉल्टींग गो. ब्रॅकवेल ४, नेविल झे. स्नटनर झे. ब्रेकवेल ६६, सिडले झे. लॅथम गो. क्रे ग 0, हेजलवूड त्रि.गो. स्नटनर ४, लॉओन जेल विल्यमसन गो. बोल्ट ३४, स्ट्रॉस नाबाद २४. अवांतर (९). एकूण ७२.१ षटकांत सर्वबाद २२४. गोलंदाजी : साऊथी १७-१-५०-१, बोल्ट १७-५-४१-२, ब्रेकवेल १२.१-३-१८-३, स्नटनर १६-१-५४-१, क्रेग १०-१-५३-२.न्यूझीलंड दुसरा डाव : लॅथम झे. नेविल गो. हेजलवूड १०, गुप्टील झे. मार्श गो. हेजलवूड १७, विल्यमसन झे. नेविल गो. मार्श ९, टेलर पायचित गो. हेजलवूड ३२, मॅक्युलम पायचित गो. मार्श २०, स्नटनर खेळत आहे १३, बी. जे. वॉटलिंग खेळत आहे ७. अवांतर (८). एकूण ३७ षटकांत ५ बाद ११६. गोलंदाजी : हेजलवूड १६-५-३२-३, सिडल १०-४-२२-०, मार्श ८-०-४४-२, लियॉन ३-०-१०-०.