शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय कॅरम स्पर्धा : विदर्भ, तामिळनाडू संघांना सांघिक विजेतेपद 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 3:15 PM

राष्ट्रीय व आंतर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत विदर्भ आणि तामिळनाडू संघांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे सांघिक जेतेपद नावावर केले.

कुडाळ : ४७ व्या राष्ट्रीय व आंतर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत विदर्भ आणि तामिळनाडू संघांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे सांघिक जेतेपद नावावर केले. विदर्भ संघाने पुरुष सांघिक गटात कर्नाटक संघावर विजय मिळवला. महिला आंतरराज्य सांघिक गटात गतविजेत्या तामिळनाडूने आपले वर्चस्व कायम  राखताना अंतिम सामन्यात बिहारचा २-१ असा पराभव केला. 

पुरुष गटात विदर्भाच्या निलेश बनसोड व गुल खान जोडीला कर्नाटकच्या शिव कुमार व अरुण कुमार जोडीने सरळ दोन सेटमध्ये १८-१६, २०-१६ असे सहज पराभूत करून आघाडी घेतली असतानाही एकेरीच्या दोनही सामन्यात कडव्या लढतीनंतर विदर्भने बाजी मारली. विदर्भच्या इर्शाद अहमदने पहिला सेट गमावल्यानंतरही ८-२५, २५-१८, २३-० असा विजय मिळवून सामना बरोबरीत आणला. दुसऱ्या लढतीमध्ये विदर्भच्या निखिल लोखंडेने कर्नाटकच्या एम. विनोदवर २५-१२,६-२२, २५-१५ असा विजय मिळवून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत तेलंगणाच्या  महम्मद वसीम व अश्विन कुमार जोडीने तामिळनाडूच्या जी गणेशन व डी डी त्यागराज जोडीसमोर सपशेल नांगी टाकली. त्यांचा २२-१९, २५-३ असा पराभव करत तामिळनाडूने सुरुवातीलाच आघाडी घेतली. मात्र तेलंगणाच्या एस आदित्यने तमिळनाडूच्या एम सुमनला २५-२, २५-१० असा तर तेलंगणाच्याच महम्मद अहमदने तामिळनाडूच्या  टी कुमारला २५-१०, २५-५ अशी मात करत आपल्या संघाला तिसऱ्या क्रमांकाचे पदक मिळवून दिले.  

                                                                                      महिला आंतरराज्य सांघिक गटात पहिल्या एकेरी सामन्यात बिहारच्या खुशबू राणीने तामिळनाडूच्या एस. रोशनीचा २१-१५,२३-१० असा पराभव केला. दुसऱ्या एकेरी सामन्यात तामिळनाडूच्या एल. एम्सवर्धिनीने बिहारच्या ममता कुमारिचा १६-१२, २४-१२ असा पराभव करत १-१ अशी बरोबरी केली .निर्णायक दुहेरीच्या सामन्यात तामिळनाडूच्या एम ख्वाझीमा व बी. शोभिका यांनी बिहारच्या संध्या सिंह व गुरिया राणी सिंग या जोडीचा २५-७,२२-१७ असा पराभव करत तामिळनाडूला अजिंक्यपद मिळवून दिले .                                                                                                                    तिसऱ्या क्रमांक करीता झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने आंध्रप्रदेशचा २-१ असा पराभव केला . महाराष्ट्राच्या स्नेहा मोरेने आंध्रच्या ए भवानीचा चुरशीच्या सामन्यात २५-०९,१०-२२,२५-०४ असा पराभव करत संघाला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या एकेरीच्या सामन्यात आंध्रच्या एम.एस.हरिकाने महाराष्ट्राच्या प्रीती खेडेकरचा ७-२५,२२-११,१७-१५ असा पराभव करत १-१ अशी बरोबरी केली. निर्णायक दुहेरीच्या सामन्यात महाराष्टाच्या मैत्रेयी गोगटे व पुष्करणी भट्टड या जोडीने आंध्रच्या तनुजा व हुस्न समिरा या जोडीचा १८-१५,२५-०० असा सरळसरळ सेटमध्ये पराभव करत महाराष्ट्राला तिसरा क्रमांक प्राप्त करून दिला.

टॅग्स :Vidarbhaविदर्भTamilnaduतामिळनाडूsindhudurgसिंधुदुर्ग