शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

नरसिंग यादववर चार वर्षांची बंदी; रिओ ऑलिम्पिकमधून बाहेर

By admin | Updated: August 19, 2016 06:12 IST

भारताचा अव्वल कुस्तीपटू नरसिंग यादव याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. ब्राजीलच्या कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्‍पोर्ट्स (सीएएस)ने चार तास चाललेल्या

ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. १९ - भारताचा अव्वल कुस्तीपटू नरसिंग यादव याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. 
ब्राजीलच्या कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्‍पोर्ट्सने (सीएएस) चार तास चाललेल्या युक्तीवादानंतर नरसिंग यादव डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने त्याच्यावर ऑलिम्पिकसाठी पुढील चार वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय दिला. तसेच, त्याची रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची परवानगी सुद्धा नाकारली आहे.  
विशेष म्हणजे दोन दिवसापुर्वीच जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेने (वाडा) केलेल्या अपीलवर केलेल्या सुनावनीनंतर क्रीडा लवादाने नरसिंग यादवला स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिली. ‘वाडा’ने याआधी राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) नरसिंगला डोपिंगबाबत दिलेल्या क्लीनचीटविरोधात अपील केले होते. परंतू, क्रीडा लवादाने याबाबत नरसिंग यादवच्या बाजूने निकाल देताना सर्व भारतीयांना दिलासा दिला होता.
मात्र, आता कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्‍पोर्ट्सने नरसिंग यादववर चार वर्षांची बंदी घालण्याचा आणि रिओ ऑलिम्पिकमध्ये भाग न घेण्याचा निर्णय दिल्याने त्याचे रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न भंगले आहे.