शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

नरेनची गोलंदाजी शैली पुन्हा संशयाच्या फेऱ्यात

By admin | Updated: April 25, 2015 09:31 IST

वेस्ट इंडिजचा जादुई फिरकी गोलंदाज सुनील नरेन याची गोलंदाजी शैली पुन्हा एकदा संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडून सनरायजर्स

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा जादुई फिरकी गोलंदाज सुनील नरेन याची गोलंदाजी शैली पुन्हा एकदा संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडून सनरायजर्स हैदराबादविरुद्ध २२ एप्रिल रोजी खेळताना नरेनच्या गोलंदाजीची मैदानी पंचांनी तक्रार केली होती.ज्या दोन पंचांनी नरेनची गोलंदाजी शैली संशयास्पद संबोधली त्यांची नावे रिचर्ड इलिंगवर्थ आणि विनीत कुलकर्णी अशी आहेत. बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार विशाखापट्टणम येथे झालेल्या या सामन्यादरम्यान दोन्ही पंचांनी नरेनचे काही चेंडू संशयास्पद शैलीतील असल्याचा अहवाल दिला आहे. ‘नरेन हा आयपीएलमधील पुढील सामन्यात गोलंदाजी करू शकतो; शिवाय आयसीसी व बीसीसीआयची मान्यता असलेल्या चेन्नई येथील श्री रामचंद्र आॅर्थोस्कोपी अ‍ॅन्ड स्पोर्ट्स सायन्स सेंटरमध्ये बायोमेकॅनिकल परीक्षण करून घेऊ शकतो.’ चेन्नईतील याच केंद्रात बायोमेकॅनिकल परीक्षण यशस्वी झाल्यानंतर नरेनला हिरवी झेंडी मिळाली होती. त्यानंतर आयपीएल खेळण्याची परवानगी बहाल करण्यात आली. त्याला पुन्हा एकदा चाचणी द्यावी लागेल. आयसीसी नियमानुसार नरेनच्या गोलंदाजी शैलीची तिसऱ्यांदा तक्रार झाल्यास त्याच्यावर वर्षभराची बंदी लागू शकते. (वृत्तसंस्था)