शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

‘नारायणा’स्त्र जोरात

By admin | Updated: October 11, 2014 04:33 IST

जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत आज, शुक्रवारी झालेली पाचवी फेरी चौथ्या फेरीप्रमाणेच सुनीलधूत नारायणन याने गाजवली

अमोल मचाले, पुणेजागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत आज, शुक्रवारी झालेली पाचवी फेरी चौथ्या फेरीप्रमाणेच सुनीलधूत नारायणन याने गाजवली. भारताच्या या इंटरनॅशनल मास्टरने आज बल्गेरियाचा ग्रँडमास्टर व्लादिस्लाव कोवालोव याला पाणी पाजले. सलग दुसऱ्या फेरीत नारायणन याने ग्रँडमास्टर दर्जाच्या खेळाडूला पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला. विशेष म्हणजे, काल पोलंडचा ग्रँडमास्टर कामिल द्रागून भारताच्या ‘नारायणा’स्त्रासमोर निष्प्रभ ठरला होता. पाचव्या फेरीअखेर नारायणन याने ४.५ गुणांची कमाई केली असून तो कॉरी जॉर्ज (पेरू) आणि लू शांगलेई (चीन) यांच्यासह संयुक्तपणे अव्वल स्थानी आहे.अहमदनगर रोडवरील हयात हॉटेलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आज सर्वाधिक चर्चा झाली ती नारायणनची. त्याने भारतीय समर्थक तसेच खेळाडूंमध्येही जल्लोषाचे वातावरण करणारा विजय नोंदवला. काल चौथ्या फेरीअखेर नारायणन आणि कोवालोव हे दोघेही संयुक्तपणे अव्वल स्थानी होते. आज उभय खेळाडूंतील लढतीत नारायणनची गुणवत्ता आणि बलाढ्य कोवालोवचा अनुभव यांचा कस लागणार होता. यात ‘होम ग्राऊंड’वर खेळणाऱ्या नारायणनची गुणवत्ता सरस ठरली. कोवालोवच्या धूर्त चालींना दमदार प्रत्युत्तर देत ५६व्या चालीनंतर या खेळाडूने विजय साजरा केला.