शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

"वर्षाअखेर अव्वल तीनमध्ये येण्याचे माझे लक्ष्य"; भारताचा बॅडमिंटन स्टार चिराग शेट्टीचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 09:25 IST

रविवारी मुंबईतील गोरेगाव स्पोर्टस क्लब बॅडमिंटन हॉलला चिरागचे नाव देण्यात आले. त्या निमित्ताने 'लोकमत'शी साधला विशेष संवाद

रोहित नाईक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: 'गेल्या वर्षी ऑलिम्पिकनंतर आम्ही केवळ एकच स्पर्धा खेळल्यामुळे जागतिक क्रमवारीत अव्वल तीनमधून थेट सातव्या-आठव्या स्थानी आलो. पण, यंदा वर्षाअखेर पुन्हा एकदा अव्वल तीनमध्ये येण्याचे आमचे लक्ष्य आहे,' असे भारताचा स्टार बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी याने 'लोकमत'ला सांगितले. रविवारी मुंबईतील गोरेगाव स्पोर्टस क्लब (जीएससी) येथील बॅडमिंटन हॉलला चिरागचे नाव देण्यात आले.

यावेळी, जीएससीचे अध्यक्ष डॉ. विनय जैन, संयुक्त सचिव संजय मालू, मानद सचिव राखी सोनीगिरा आणि चिरागचे प्रशिक्षक उदय पवार यांच्या उपस्थितीत चिरागला सन्मानित करण्यात आले. चिरागने यावेळी सांगितले की, 'ज्या कोर्टवर मी बॅडमिंटनचे धडे गिरवले, त्या कोर्टला माझे देण्यात आले. येथूनच २१ वर्षांपूर्वी माझा बॅडमिंटन प्रवास सुरू झाला होता. एक खेळाडू म्हणून माझ्यासाठी हा भावनिक क्षण आहे.'
नुकताच मलेशिया ओपन, इंडिया ओपन स्पर्धेत चिराग सात्त्विक साईराज रंकीरेड्डी यांना पुरुष दुहेरी उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. चिरागने म्हणाला की, 'नक्कीच थोडी निराशा आहे; पण आम्ही दमदार पुनरागमन करू.

आम्ही सध्या नव्या प्रशिक्षकासोबत खेळत असल्याने ताळमेळ बसण्यास थोडा वेळ लागेल. पण, लवकरच आम्ही लय पकडू. आता आम्हाला आता ऑल इंग्लंड स्पर्धेचे वेध लागले असून, येथे जेतेपदाचे लक्ष्य बाळगले आहे. क्रमवारीकडे मी फारसे गंभीरतेने पाहत नाही, कारण प्रत्येक आठवड्यात क्रमवारी बदलत राहते. पण होय, अव्वल स्थानी येणं नक्कीच चांगले वाटते. आम्ही अव्वल स्थान गाठल्याचा आनंद अवर्णनीय होता. आता आमचे लक्ष्य पुन्हा अव्वल तीनमध्ये येण्याचे आहे.
-चिराग शेट्टी, बॅडमिंटनपटू

टॅग्स :BadmintonBadminton