शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

मुस्तफिजूरची काळजी घेण्याची गरज!

By admin | Updated: May 15, 2016 04:26 IST

बांगलादेशचा मुस्तफिजूर रहमान गुणी खेळाडू आहे. त्याची शरीरयष्टी कसदार असली, तरी भक्कम नाही. त्याच्या चेंडूत खूप वेगही नाही. चेंडू स्विंग करणारा तो जगातील एकमेव गोलंदाजदेखील नाही.

रवी शास्त्री लिहितो़बांगलादेशचा मुस्तफिजूर रहमान गुणी खेळाडू आहे. त्याची शरीरयष्टी कसदार असली, तरी भक्कम नाही. त्याच्या चेंडूत खूप वेगही नाही. चेंडू स्विंग करणारा तो जगातील एकमेव गोलंदाजदेखील नाही. कुणीही कटर्स चेंडू टाकू शकतो; पण मुस्तफिजूर हा चेंडू टाकल्यानंतर स्मित करतो. ही बाब फार कमी गोलंदाजांमध्ये पाहायला मिळेल. टी-२० प्रकारात सध्याचा सर्वोत्कृष्ट युवा गोलंदाज म्हणून तज्ज्ञ मुस्तफिजूर याला का निवडतात, यामागील भूमिका समजून घ्यावी लागेल.भारताविरुद्ध त्याने वन डे मालिकेत दोनदा पाच वा त्यापेक्षा अधिक गडी बाद केले. कसोटी पदार्पणात त्याने ज्या दिग्गजांना बाद केले त्यात अमला, ड्यूमिनी आणि डी कॉॅक यांचा समावेश आहे. आयपीएलच्या सध्याच्या सत्रात तो पहिल्यांदा खेळतो आहे; पण कुणीही फलंदाज त्याच्या चेंडूवर वर्चस्व मिळवू शकला नाही. भल्याभल्या गोलंदाजांना संपूर्ण कारकिर्दीत जे जमत नाही ते मुस्तफिजूरने काही महिन्यांत मिळविले. सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे आपल्या शैलीचे रहस्य उलगडत नव्हते, हा इतिहास आहे. कुंबळे, मॅक्ग्रा, वॉर्न यांनी कसोटी कारकिर्दीत अनेकांना त्रस्त केले. सर्वांना गडी बाद करण्यात आनंद यायचा. अनेक फलंदाज त्यांचा मारा समजू शकले नाहीत. मुस्तफिजूरकडेही असाच गुण आहे. त्यावर त्याचे कमालीचे वर्चस्व आहे. तो एक चेंडू असाही टाकतो, की थोडा थांबून हा चेंडू थेट फलंदाजांकडे येतो. गोलंदाजी शैलीत मात्र कुठलाही बदल न करताच हा चेंडू मुस्तफिजूर टाकू शकतो हे विशेष. मनागटाची जादू हेच त्याचे शस्त्र आहे. युवा फलंदाज ऋषभ पंत याने मुस्तफिजूरला एक चौकार व षटकार खेचला होता. (टीसीएम)