शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईची पुन्हा खडतर परीक्षा!

By admin | Updated: April 25, 2015 00:15 IST

‘दुनिया हिला देंगे’ म्हणत आयपीएलसाठी रणशिंग फुंकलेल्या मुंबई इंडियन्सला प्रत्यक्ष मैदानात मात्र प्रतिस्पर्धी संघ एकामागून एक धक्के देत आहेत.

मुंबई : ‘दुनिया हिला देंगे’ म्हणत आयपीएलसाठी रणशिंग फुंकलेल्या मुंबई इंडियन्सला प्रत्यक्ष मैदानात मात्र प्रतिस्पर्धी संघ एकामागून एक धक्के देत आहेत. एकूणच यंदाच्या सत्रातील कामगिरी पाहता मुंबई इंडियन्सची ही टॅग लाइन नक्की कोणासाठी आहे, याचेच कोडे पडले आहे. त्यात आज मुंबईला घरच्या मैदानावर आव्हान असेल ते बेधडकपणे खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादचे.सहा सामन्यांतून केवळ एकच विजय मिळवता आल्याने साहजिकच या सामन्यात मुंबई प्रचंड दडपणाखाली असेल. दिल्लीकरांनी गत सामन्यात जबरदस्त चोप देताना मुंबईकर गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. एकटा लसिथ मलिंगा प्रतिस्पर्धी संघाला जखडवून ठेवत आहे. तरी बळी घेण्यात त्याला अपयश येत आहे. कर्णधार रोहित शर्माने संघात अनेक बदल केले; मात्र त्यात यश मिळाले नाही. बंगळुरूविरुद्धच्या विजयाने संघ कायम राहील अशी आशा होती. परंतु दिल्लीविरुध्द पराभव झाल्याने आता संघात काय बदल होणार याबाबत उत्सुकता आहे. त्यातच कोरी अँडरसन दुखापतीमुळे आयपीएल बाहेर गेल्याने फिंचनंतर दुसऱ्या आक्रमक फलंदाजाला मुंबई मुकणार. त्याच वेळी ‘सिक्सर किंग’ म्हणून ओळखला जाणारा न्यूझीलंडचा अष्टपैलू कॉलीन मुन्रो याची जोश हेजलवूडच्या जागी निवड झाल्याने मुंबईला चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.फलंदाजीमध्ये मुंबईची मदार नेहमीप्रमाणे लेंडल सिमन्स, रोहित शर्मा, केरॉन पोलार्ड, उन्मुक्त चंद आणि अंबाती रायडू यांच्यावर असेल. तर गोलंदाजीत मलिंगा आणि हरभजनसिंग व्यतिरिक्त इतरांना आपली छाप पाडण्यात अपयश आले आहे. दुसऱ्या बाजूला मुंबईच्या तुलनेत हैदराबाद चांगल्या लयीत आहेत. गत सामन्यात डेव्हीड वॉर्नर आणि शिखर धवन यांनी केकेआरची धुलाई केली असल्याने मुंबईला या जोडीकडून धोका आहे. शिवाय गोलंदाजीमध्ये हैदराबादकडे डेल स्टेन, भुवनेश्वर कुमारसह मजबूत ताफा असल्याने मुंबईला विजयासाठी चांगलाच घाम गाळावा लागेल. (क्रीडा प्रतिनिधी)