शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचा डेम्पो विरुध्द पराभव

By admin | Updated: April 12, 2015 02:16 IST

मुंबई एफसीला डेम्पो एससीकडून ०-१ ने पराभवासह आयलीग फुटबॉल स्पर्धेत घरच्या मैदानावर सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले़

मुंबई : मुंबई एफसीला डेम्पो एससीकडून ०-१ ने पराभवासह आयलीग फुटबॉल स्पर्धेत घरच्या मैदानावर सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले़ या सामन्यातील एकमेव निर्णायक गोल कार्लोस हर्नांडेजने पेनल्टीवरून केला़ या पराभवामुळे मुंबईची एका स्थानाने घसरण झाली असून मुंबई १३ गुणांसह आठव्या स्थानी आहे. तर डेम्पोने यंदाच्या सत्रातील केवळ दुसरा विजय मिळवताना १३ गुणांसह दहाव्या स्थानावरुन सातव्या स्थानी झेप घेतली.चर्चगेट येथील कुपरेज स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात यजमान मुंबईला सामन्यातील अखेरच्या क्षणी केलेली चूक महागात पडली. पहिल्या सत्रात डेम्पोने अपेक्षेप्रमाणे आक्रमक खेळ करत सामन्यावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. लेनी रॉड्रीग्स, स्ट्रायकर कार्लोस हर्नांडेस, मध्यरक्षक हरुन फकरुद्दिन आणि जॉय फेरारो या अव्वल खेळाडूंनी तुफान आक्रमण करताना गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण करताना मुंबईला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबईने आक्रमण रोखताना पहिल्या सत्रात सामन्यात गोलशून्य बरोबरी साधली.यानंतर मात्र मुंबई एफसीने जबरदस्त खेळ करताना पुनरागमन करण्याचा जोरदार प्रयत्न केला. डेम्पोच्या आक्रमणाला आक्रमणानेचे उत्तर देताना मुंबईने गोल आक्रमक चाली रचण्याचा सपाटा लावला. मात्र डेम्पोचे भक्कम संरक्षण भेदण्यात अपयश आल्याने मुंबईला गोल करता आला नाही. यानंतर दोन्ही संघानी अखेरपर्यंत झुंजार खेळ करीत सामना रंगतदार केला. निर्धारीत वेळेनंतर अतिरीक्त वेळेत खेळविण्यात आलेल्या खेळामध्ये खरे नाट्य घडले. मुंबईने हर्नांडेजविरुद्ध गोलक्षेत्रात फाऊल केल्याने डेम्पोला पेनल्टी कीक बहाल करण्यात आली. या सुवर्णसंधीचा फायदा उचलताना हर्नांडेजने निर्णायक विजयी गोल केला. (क्रीडा प्रतिनिधी)