शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मुगुरुजा फ्रेंच ओपन चॅम्पियन

By admin | Updated: June 5, 2016 00:25 IST

गरबाईन मुगुरुजा हिने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये अव्वल मानांकित आणि गतचॅम्पियन सेरेना विलियम्सचा ७-५, ६-४ असा पराभव करीत शनिवारी येथे आपल्या

पॅरिस : गरबाईन मुगुरुजा हिने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये अव्वल मानांकित आणि गतचॅम्पियन सेरेना विलियम्सचा ७-५, ६-४ असा पराभव करीत शनिवारी येथे आपल्या कारकिर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅमच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या विजयाबरोबरच चौथ्या मानांकित मुगुरुजाने जगातील नंबर वन सेरेनाला विक्रमाची बरोबरी करणाऱ्या २२व्या मोठ्या विजेतेपदापासून वंचित ठेवले. २२ वर्षीय मुगुरुजा १९९८ नंतर अरांत्सा सँचेज विकारियोनंतर पॅरिसमध्ये महिला चॅम्पियन बनणारी पहिली स्पेनची खेळाडू ठरली. विशेष म्हणजे प्रथमच मोठ्या स्पर्धेत फायनल गाठून विजेतेपद पटकावण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. याआधी फ्लाविया पेनेटाने गेल्या वर्षी अमेरिकन ओपन जिंकली, तर एंजेलिक कर्बरने यावर्षी आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये ही कामगिरी केली होती.दुसरीकडे सेरेनाला सलग दुसऱ्या ग्रँडस्लॅम फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आणि स्टेफी ग्राफच्या १९६८नंतर ओपन युगाचा २२ एकेरी ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी सेरेनाला आता कमीतकमी विम्बल्डनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. विम्बल्डनमध्ये ती गत चॅम्पियन असून याआधी तिने सहा वेळेस विजेतेपद पटकावले आहे.मुगुरुजासाठी फायनलचा प्रवास खूप सुकर ठरला आणि तिने यादरम्यान फक्त एका सामन्यामध्ये एक सेट गमावला, तर सेरेनाला उपांत्यपूर्व फेरी आणि उपांत्यफेरीत विजय मिळवण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागला. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या सेटमध्ये सावध सुरुवात करताना २-२ अशी बरोबरी साधली. सेरेनाने नंतर दुहेरी चूक करून आपली सर्व्हिस गमावली आणि मुगुरुजाने ४-२ अशी आघाडी घेतली.