शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनिवासनसाठी चालढकल

By admin | Updated: September 8, 2014 03:50 IST

बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना वेळ मिळावा, यासाठी बीसीसीआयने आज, रविवारी सदस्यांसोबत झालेल्या अनौपचारिक बैठकीमध्ये वार्षिक बैठक (एजीएम) स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

चेन्नई : टीकाकारांचे लक्ष्य ठरलेले बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना वेळ मिळावा, यासाठी बीसीसीआयने आज, रविवारी सदस्यांसोबत झालेल्या अनौपचारिक बैठकीमध्ये वार्षिक बैठक (एजीएम) स्थगित करण्याचा निर्णय घेतला.एजीएमबाबत चर्चा करण्यासाठी या अनौपचारिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या मुकुल मुद््गल समितीतर्फे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम अहवाल सोपविला जात नाही तोपर्यंत एजीएम स्थगित करण्यात यावी, असे मत बैठकीमध्ये सहभागी झालेल्या अनेकांनी व्यक्त केले. बोर्डाच्या कार्यकारिणीची बैठक २६ सप्टेंबरला बोलविण्यात आलेली आहे. त्यामुळे एजीएम ३० सप्टेंबर या निर्धारित तारखेला होण्याची शक्यता नाही. नियमानुसार दोन्ही बैठकांमध्ये किमान तीन आठवड्यांचे अंतर असणे आवश्यक आहे. आजच्या बैठकीला श्रीनिवासन प्रामुख्याने उपस्थित होते. त्यात १८ संलग्न संस्थांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष सहभागी झाले होते, तर अन्य तीन संलग्न संस्थांचे प्रतिनिधी टेलिकॉन्फरसच्या माध्यमातून सहभागी झाले. टेलिकॉन्फरसच्या माध्यमातून सहभागी झालेल्या सदस्यांमध्ये अंतरिम अध्यक्ष शिवलाल यादव यांचा समावेश आहे. यादव हैदराबाद क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधित्व करतात. बीसीसीआयचे एक अधिकारी म्हणाले, ‘आता एजीएम ३० सप्टेंबरला आयोजित होण्याची कुठलीच शक्यता नाही. आजच्या बैठकीमध्ये जवळजवळ २० सदस्य सहभागी झाले होते. त्यामुळे ३१ संलग्न सदस्य असलेल्या या संघटनेमध्ये श्रीनिवासन यांना बहुमत असल्याचे सिद्ध होते.’बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या अन्य निर्णयांमध्ये विंडीजविरुद्धच्या आगामी मालिकेतील पाचवा वन-डे आता २० आॅक्टोबरला कोलकातामध्ये खेळला जाणार आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ही लढत १७ आॅक्टोबरला कटकमध्ये खेळली जाणार होती. २२ आॅक्टोबरला आयोजित टी-२० सामन्याचे यजमानपद कटकला बहाल करण्यात आले. (वृत्तसंस्था)विंडीज संघाच्या सहा आठवड्यांच्या दौऱ्याचा प्रारंभ पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेने होणार आहे. या मालिकेला ८ आॅक्टोबरला कोची येथे खेळल्या जाणाऱ्या लढतीने सुरुवात होणार आहे. एकमेव टी-२० आंतरराष्टीय सामन्यानंतर तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला ३० आॅक्टोबरपासून हैदराबाद येथे प्रारंभ होणार आहे. दरम्यान, बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले की, बोर्डाच्या सदस्यांनी नवनियुक्त संघाचे संचालक रवी शास्त्री यांचे अभिनंदन केले. शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने इंग्लंडविरुद्ध वन-डे सामन्यांची मालिका जिंकली. याव्यतिरिक्त बीसीसीआयने वार्षिक मन्सूर अली पटोदी स्मृती व्याख्यान कोलकातामध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. (वृत्तसंस्था)