मेस्सीचे धडाकेबाज पुनरागमन; बार्सिलोना विजयी

By Admin | Updated: October 17, 2016 04:54 IST2016-10-17T04:54:16+5:302016-10-17T04:54:16+5:30

शानदार खेळाच्या जोरावर बार्सिलोना एफसीने एकतर्फी झालेल्या सामन्यात डिपोर्टिवो ला कारुना संघाचा ४-० असा धुव्वा उडवला.

Messi retreats; Barcelona won | मेस्सीचे धडाकेबाज पुनरागमन; बार्सिलोना विजयी

मेस्सीचे धडाकेबाज पुनरागमन; बार्सिलोना विजयी


माद्रिद : दुखापतीतून सावरलेल्या स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने आपला जलवा दाखवताना केलेल्या शानदार खेळाच्या जोरावर बार्सिलोना एफसीने एकतर्फी झालेल्या सामन्यात डिपोर्टिवो ला कारुना संघाचा ४-० असा धुव्वा उडवला. मेस्सीसह
रफीन्हा आणि लुईस सुआरेज यांनीही गोल करून सांघिक खेळाचे प्रदर्शन केले.
या शानदार विजयासह ला लीगा स्पर्धेत अव्वल स्थानी असलेल्या अ‍ॅटलेटिको माद्रिद आणि रियाल माद्रिद यांच्यानंतर दोन गुणांनी बार्सिलोना मागे आहे. आक्रमक सुरुवात केलेल्या बार्सिलोनाने सुरुवातीपासूनच डिपोर्टोवा संघावर दडपण ठेवले.
पहिल्या सत्रात मैदानाबाहेर बसलेल्या मेस्सीने दुसऱ्या सत्रात तब्बल तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पुनरागमन केले. या वेळी त्याने पुनरागमनाच्या अवघ्या ३ मिनिटांमध्येच शानदार गोल करून बार्सिलोनाच्या दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, अल्कांतरा रफिन्हा याने दोन गोल करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. तसेच, सुआरेजनेदेखील आपल्या लौकिकानुसार गोल करून शानदार कामगिरी केली. या वेळी ३-० अशा भक्कम आघाडीवर असलेल्या बार्सिलोनाने मध्यंतरानंतर मेस्सीच्या जोरावर डिपोर्टिवोच्या आव्हानातली हवा काढली. त्याचवेळी, अन्य सामन्यांत अ‍ॅटलेटिको माद्रिदने यानिक कारास्कोच्या चमकदार हॅट्ट्रिकच्या जोरावर ग्रेनाडा संघाचा ७-१ असा फडशा पाडला. निकोलस गेटान यानेही दोन गोल करताना यानिकला चांगली साथ दिली. तसेच, रियाल माद्रिदनेही दणदणीत बाजी मारताना रियाल बेटिसला ६-१ असे लोळवले. पहिल्याच सत्रात चार गोल करून माद्रिदने आपला विजय निश्चित केला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Messi retreats; Barcelona won