शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

आॅलिम्पिकमध्ये सहभागी होणार मायलेक जोडी

By admin | Updated: May 4, 2016 21:16 IST

आॅलिम्पिक स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच निनो सालुक्वाद्झे - त्सोत्ने मचाववरीआनी ही मायलेकाची जोडी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणार

ऑनलाइन लोकमतत्बिलिसी, दि. 4- आगामी रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत जॉर्जियाच्या नावावर किती पदकं येणार हे येणाऱ्या आॅगस्ट महिन्यात कळेलंच. मात्र यंदाच्या ओलिम्पिकमध्ये जॉर्जियाच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदला जाणार हे निश्चित आहे. आॅलिम्पिक स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच निनो सालुक्वाद्झे - त्सोत्ने मचाववरीआनी ही मायलेकाची जोडी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणार असून नेमबाजीमध्ये जॉर्जियाच्या नावावर हा विक्रम नोंदवला जाणार आहे.आजपर्यंत आॅलिम्पिकमध्ये अनेक परिवाराने आपली चमक दाखवली. एका परिवारातील एका पिढीतून दुसऱ्या पिढीने आॅलिम्पिक गाजवल्याचे अनेक उदाहरणे दिसून येतील. मात्र पहिल्यांदाच एकाच आॅलिम्पिक स्पर्धेत मायलेक जोडी सहभागी होण्याचा योगायोग जुळून आला आहे. विशेष म्हणजे निनो या तब्बल आठव्यांदा आॅलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत असन त्यांना आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीचा अनुभव आहे. मात्र यंदाची आॅलिम्पिकम त्यांच्यासाठी विशेष असून आपला १८ वर्षीय मुलगा त्सोत्नेसह नेमबाजीमध्ये सहभागी होणार आहेत.फेब्रुवारीमध्ये झालेल्या युरोपियन चॅम्पियनशीपमध्ये त्सोत्ने याने आपली सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करताना १० मीटर एअर पिस्तुलमध्ये आॅलिम्पिक कोटा मिळवला. आॅलिम्पिक इतिहासतज्ज्ञ बिल मॅल्लोन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पिता-पित्राच्या ५६ जोडींनी एकाच आॅलिम्पिकमध्ये सहभाग घेतला असून, पिता-पुत्रीच्या १२ जोडींनी एकाच आॅलिम्पिकमध्ये आपले कौशल्य सादर केले आहे. त्याचप्रमाणे मायलेकींच्या २ जोडींनीही आॅलिम्पिकमध्ये आपली चमक दाखवली आहे. मात्र पहिल्यांदाच आॅलिम्पिकमध्ये मायलेकाची जोडी सहभागी होत असल्याने निनो व त्सोत्ने यांच्या कामगिरीवर साऱ्या विश्वाचे लक्ष असेल.जॉर्जियन शूटींग फेडरेशनची प्रतिनिधी म्हणून मला अत्यंत आनंद आहे. पण त्याहून अधिक देशाकडून खेळणाऱ्या मुलाची आई म्हणून अधिक आनंद आहे.- निनो सालुक्वाद्झे.