शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मँचेस्टर युनायटेड विजयी

By admin | Updated: November 24, 2014 02:40 IST

इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये शनिवारी उशिरा झालेल्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडने आर्सनलचा २-१ गोल फरकाने पराभव केला. या विजयासह मँचेस्टर युनायटेडने गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर झेप घेतली

केदार लेले, लंडनइंग्लिश प्रीमियर लीगमध्ये शनिवारी उशिरा झालेल्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडने आर्सनलचा २-१ गोल फरकाने पराभव केला. या विजयासह मँचेस्टर युनायटेडने गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर झेप घेतली. आर्सनल आणि मँचेस्टर युनायटेड यांच्यात होणारी ही २१९ वी लढत होती. मँचेस्टर युनायटेडचा संघ ९३ वेळा विजयी झाला आहे, तर आर्सनल ७९ वेळा विजयी झाला आहे. ४८ लढती अनिर्णीत राहिल्या आहेत.पूर्वार्धात वर्चस्व गाजवणाऱ्या आर्सनलला मँचेस्टर युनायटेडचा अभेद्य बचाव भेदता न आल्यामुळे, आर्सनल आणि मँचेस्टर युनायटेड संघात गोलशून्य बरोबरी राहिली. उत्तरार्धात (५५ व्या मिनिटाला) विल्शायारच्या घोट्याला जखम झाली आणि त्याला मैदान सोडावे लागले. त्यानंतर एक मिनिटातच आर्सनल विरुद्ध मँचेस्टर युनायटेडने १-० अशी आघाडी घेतली. ती आर्सनलच्या किएरन गिब्सकडून ५६ व्या मिनिटाला झालेल्या स्वयंगोलमुळे.५६व्या मिनिटाला किएरन गिब्सकडून स्वयंगोल झाल्यामुळे आर्सनलचे समर्थक नाराज झाले, पण हा गोल होताना गब्स व गोलकिपर सेझेस्नी यांच्यात टक्कर झाली. ज्यात सेझेस्नी जखमी झाला आणि त्यालासुद्धा मैदान सोडावे लागले.जायबंदी खेळाडू आणि ०-१ ने पिछाडीवर पडलेल्या आर्सनल संघाने पुनरागमन करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. सामना संपायला केवळ ५ मिनिटे बाकी असताना स्ट्रायकर कप्तान वेन रूनीने (८५व्या मिनिटाला) पाहुण्या मँचेस्टर युनायटेड संघाला २-० अशी निर्विवाद आघाडी मिळवून दिली. काउंटर अ‍ॅटॅकवर फेलेनी आणि डी. मारिया या द्वयीने दिलेल्या उत्कृष्ट पासवर वेन रूनीने हा गोल केला.०-२ ने पिछाडीवर पडलेल्या आर्सनल संघाने जिवाचे रान करीत सामन्यात पुनरागमन करण्यास शर्थीचे प्रयत्न केले. तीन महिन्यांनी पुनरागमन करणाऱ्या जिरूने ‘इंज्युरी-टाइम’ सुरू होण्यापूर्वी काहीच क्षण बाकी असताना केलेल्या गोलमुळे आर्सनलने युनायटेडची आघाडी एका गोलने कमी केली. मिनिटांच्या वाढीव ‘इंज्युरी-टाइम’मध्ये मँचेस्टर युनायटेडने आर्सनलचे हल्ले परतवले आणि मँचेस्टर युनायटेडची २-१ गोल फरकाने सरशी झाली.