शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

मानसी चिपळूणकरला तिहेरी संधी

By admin | Updated: September 11, 2015 00:32 IST

गतविजेत्या शुभम् आंब्रे व मानसी चिपळूणकर यांनी मुंबई शहर जिल्हा टेबल टेनिस स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिलांच्या अंतिम सामन्यात धडक मारली. मानसीने महिला गटासह

मुंबई : गतविजेत्या शुभम् आंब्रे व मानसी चिपळूणकर यांनी मुंबई शहर जिल्हा टेबल टेनिस स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिलांच्या अंतिम सामन्यात धडक मारली. मानसीने महिला गटासह मुलींच्या ज्युनियर व युवा गटात अंतिम फेरी गाठली असल्याने तिला स्पर्धेत तिहेरी विजेतेपदाची संधी चालून आली आहे.पुरुष गटात एकतर्फी झालेल्या उपांत्य सामन्यात शुभम्ने हरीश शिरसाटचे आव्हान ११-९, ११-९, ११-८, ११-७ असे संपुष्टात आणून अंतिम फेरी गाठली. अव्वल मानांकित परेश मुरेकरला मात्र विजयासाठी झुंजावे लागले. पाच सेटपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात त्याने तन्मय राणेचा ११-९, ११-८, ११-४, ८-११, ११-६ असा पराभव केला.दुसऱ्या बाजूला महिलांच्या गटात मानसीने तब्बल सात सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत झुंजार खेळाचे प्रदर्शन करत क्रिशा अगरवालला ९-११, ११-८, ६-११, ९-११, ११-४, ११-६, ११-५ असे लोळवले. विजेतेपदासाठी मानसीसमोर अव्वल मानांकित श्वेता पार्टेचे तगडे आव्हान असेल. ज्युनियर गटात मानसीने सहज अंतिम फेरीत प्रवेश करताना मिसबाह सुमरचा ११-१, ११-१, १४-१२, ११-५ असा धुव्वा उडवला. तसेच युवा गटामध्ये अव्वल मानांकित असलेल्या मानसीने अपेक्षित कूच करताना हिया दोशीचे आव्हान १२-१०, ११-७, ११-५, १४-१२ असे परतावून अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. (क्रीडा प्रतिनिधी)