शहरं
Join us  
Trending Stories
1
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
2
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
3
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
4
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
5
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
6
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
7
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
8
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
9
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
10
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
11
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
12
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
13
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
14
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
15
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
16
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
17
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
18
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
19
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
20
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
Daily Top 2Weekly Top 5

आक्रमक पवित्रा कायम राखणार

By admin | Updated: December 17, 2014 01:29 IST

मालिकेत बरोबरी साधण्यासाठी उत्सुक असलेला भारतीय संघ बुधवारपासून खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आक्रमक पवित्रा कायम राखणार

ब्रिसबेन : मालिकेत बरोबरी साधण्यासाठी उत्सुक असलेला भारतीय संघ बुधवारपासून खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आक्रमक पवित्रा कायम राखणार असल्याचे भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने स्पष्ट केले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला अ‍ॅडिलेड कसोटीमध्ये ४८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
अंगठ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणारा धोनी म्हणाला, ‘आक्रमक पवित्रा स्वीकारण्याचा निर्णय योग्यच होता. आम्ही लक्ष्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. विराट कोहली व मुरली विजय यांच्यादरम्यानच्या भागीदारीमुळे आम्ही लक्ष्याच्या समीप पोहोचलो होतो, पण विजय बाद झाल्यानंतर काही विकेट झटपट गेल्यामुळे आम्हाला लक्ष्य गाठण्यात अपयश आले. त्यानंतर सामना अनिर्णित राखणेही कठीण होते. त्यामुळे आम्हाला केवळ विजयासाठी प्रयत्न करावे लागले. भविष्यातही आक्रमक पवित्रा कायम राहणार आहे. त्यासाठी चांगली सुरुवात, मोठी भागीदारी आणि विशाल धावसंख्या आवश्यक आहे. सूर गवसल्यानंतरच पुढे काय करायचे, याचा निर्णय घेता येतो.’
भारतीय संघातील एकाही खेळाडूला या मैदानावर कसोटी खेळण्याचा अनुभव नाही. धोनी संघात पुनरागमन करीत असून हा ब्रेक माझ्यासाठी गरजेचा होता, असेही धोनी म्हणाला.
धोनीने पुढे सांगितले की, ‘इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान मला दुखापत झाली होती. खेळत राहिलो तर दुखापत ठीक होईल, असे वाटत होते, पण चॅम्पियन्स लीग व वन-डे खेळल्यानंतर ही दुखापत चिघळली असल्याचे माझ्या लक्षात आले. श्रीलंकेविरुध्दच्या मालिकेतून माघारीचा निर्णय महत्त्वाचा होता. कारण आॅस्ट्रेलियाविरुद्धची मालिका महत्त्वाची होती. त्यानंतर विश्वकप स्पर्धा आहे. त्यामुळे २०-२५ दिवसांचा घेतलेल्या ब्रेकमुळे दुखापतीतून सावरता आले.’ (वृत्तसंस्था)
दुसऱ्या कसोटी सामन्यातील खेळपट्टीबाबत बोलताना धोनी म्हणाला, ‘अ‍ॅडिलेडच्या तुलनेत ही खेळपट्टी वेगळी असेल. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल राहील. खेळपट्टी चांगली भासत असली तरी फिरकीपटूंना मदत मिळण्याची शक्यता धुसर आहे. गोलंदाजांच्या फुटमार्कमुळे आॅफ स्पिनरला मदत मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.’
धोनीने आर. अश्विनला अंतिम संघात स्थान देण्याचे संकेत देताना म्हटले की,‘अश्विनमुळे तळाच्या फलंदाजीला बळकटी मिळले. तळाचे फलंदाज झटपट बाद होतात, असा अनुभव आहे. अश्विन असेल तर दुसऱ्या टोकाकडून खेळणाऱ्या फलंदाजाला मदत मिळेल.’ (वृत्तसंस्था)