शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र संघ ठरला ‘चॅम्पियन’

By admin | Updated: June 15, 2017 01:48 IST

येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय ज्युनिअर पिकलबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने वर्चस्व राखताना, सांघिक विजेतेपदाला गवसणी घातली, तसेच ज्युनिअर स्पर्धेसोबतच

लोकमत न्यूज नेटवर्कडेहराडून : येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय ज्युनिअर पिकलबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने वर्चस्व राखताना, सांघिक विजेतेपदाला गवसणी घातली, तसेच ज्युनिअर स्पर्धेसोबतच आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या फेडरेशन कप पिकलबॉल स्पर्धेत मात्र राजस्थानने बाजी मारली. निर्णायक सामन्यांमध्ये केलेल्या चुकांमुळे महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. डेहराडून येथील परेड मैदानावर झालेल्या या स्पर्धेत ज्युनिअर गटात महाराष्ट्राने जबरदस्त खेळ केला. महाराष्ट्राच्या खेळाडूंमध्ये झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात, कृष्णा मंत्रीने यश पाटीलचा ११-१, ११-४ असा धुव्वा उडवून सुवर्ण पदक पटकावले. मुलींच्या गटात मात्र, राजस्थानच्या गीतम शर्माने बाजी मारत, यजमान उत्तराखंडच्या खुशी थोपाचे आव्हान ११-१, ११-० असे परतावले, तसेच कांस्य पदकाची लढत महाराष्ट्राच्याच खेळाडूंमध्ये झाली. साक्षी बाविस्करने ॠतुजा कालिकेचा ११-५, ११-० असा पराभव केला. मुलांच्या दुहेरी अंतिम लढतीत अजय चौधरी-मयूर पाटील या महाराष्ट्राच्या जोडीने सुवर्ण पटकावताना झारखंडच्या मोहम्मद जैद - मोहम्मद शाबिद अन्सारी यांचा ११-३, ११-४ असा फडशा पाडला. मुलींच्या दुहेरीमध्ये इशीका मालोदे-सलोनी देवडा या महाराष्ट्राच्या जोडीने समीक्षा शेखावत-साक्षी शेखावत या राजस्थानच्या जोडीचा ११-४, ११-२ असा धुव्वा उडवला. मिश्र दुहेरीत निशा बरेला-कुलदीप महाजन या महाराष्ट्राच्या जोडीने तुफानी खेळ करताना, कुलदीप-पिंकी या दिल्लीकरांचा ११-१, ११-० असा फडशा पाडून सुवर्ण पटकावले.