शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
3
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
4
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
5
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
6
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
7
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
8
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
9
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
10
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
11
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
12
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
13
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
14
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
15
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
16
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
17
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
18
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
19
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
20
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
Daily Top 2Weekly Top 5

गुगलवरही चालली युरो कपची जादू

By admin | Updated: June 11, 2016 06:26 IST

फुटबॉलची जादू फक्त या खेळांच्याच चाहत्यांवरच नव्हे, तर गुगलवरदेखील चालली आहे.


पॅरिस : फुटबॉलची जादू फक्त या खेळांच्याच चाहत्यांवरच नव्हे, तर गुगलवरदेखील चालली आहे. गुगलने शुक्रवारी सुरू होणाऱ्या युरो कप २0१६ साठी विशेष डुडल बनवले आहे.
गुगल नेहमीच विशेषप्रसंगी डुडल बनवते आणि युरो कपप्रती लोकांमध्ये असलेली आवड पाहता त्यावरही एक खास डुडल बनविण्यात आले आहे. त्यामुळे तेदेखील फुटबॉल चाहत्यांशी जोडले गेले आहेत. युरो कपचा उद्घाटनीय सामना यजमान फ्रान्स आणि रोमानिया यांच्यादरम्यान डी’ फ्रान्स स्टेडियममध्ये खेळवला जाईल.
डुडलमध्ये हिरव्या, पिवळ्या आणि लाल रंगात गुगल लिहिण्यात आले आहे. गुगलच्या ‘एल’ला फ्रान्सची ओळख एफिल टॉवरचा आकार देण्यात आला आहे. त्याचबरोबर या विशेष डुडलमध्ये युरो कपमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वच संघांच्या ध्वजांचा समावेश करण्यात आला आहे.
युरो कपसाठी सुरक्षाव्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे आणि त्यासाठी जवळपास ९0 हजार पोलीस कर्मचारी व सेनेच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. डी’ फ्रान्स या स्टेडियमवर गेल्या वर्षी दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात जवळपास १३0 लोकांचा मृत्यू झाला होता. स्पर्धेत एकूण १0 शहरांत सामने खेळवले जातील आणि त्यात २४ संघ सहभागी होत आहेत. त्याआधी इतक्या संघांनी सहभाग घेतला नव्हता. ही स्पर्धा १0 जुलैपर्यंत रंगणार आहे.
>रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संपाने युरो कपवर परिणाम
परिवहनमंत्री अ‍ॅलेन विडालिस यांनी शुक्रवारी युरो २0१६ फुटबॉल चॅम्पियनशिप सुरू होण्याच्या काही तास आधी संप पुकारणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आदेश दिले जाऊ शकतात, असे सांगितले. विडालिस यांनी युरोप १ रेडियोशी सांगितले की, ‘सरकार सामन्यात चाहत्यांना आणण्यासाठी उपलब्ध साधनांचा उपयोग करील आणि जर आम्हाला रेल्वे सुरू करण्याचा आदेश आला, तर आम्ही सुरू करू.’ गेल्या १0 दिवसांपासून संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा सुरू असण्यास त्यांनी नकार दिला. अधिकारी या मोठ्या फुटबॉल स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास कमी करणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. संप करण्यात कोणताही अर्थ नसल्याचेही विडालिस यांनी सांगितले.