शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विश्वचषकासाठी क्लार्ककडे नेतृत्व

By admin | Updated: January 12, 2015 02:56 IST

सध्या दुखापतग्रस्त स्टार फलंदाज मायकल क्लार्क यांच्याकडे आगामी वन-डे विश्वचषकासाठी आॅस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे

सिडनी : सध्या दुखापतग्रस्त स्टार फलंदाज मायकल क्लार्क यांच्याकडे आगामी वन-डे विश्वचषकासाठी आॅस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे; मात्र तत्पूर्वी त्याला आपले फिटनेस सिद्ध करावे लागणार आहे़ कसोटी मालिकेत प्रभावी कामगिरी करणारा फिरकी गोलंदाज नॅथन लियॉन याला मात्र या संघात स्थान मिळू शकले नाही़आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये संयुक्तरीत्या आयोजित विश्वचषक १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे़ विश्वचषकासाठी घोषित कांगारू संघच भारत आणि इंग्लंड विरुद्धच्या तिरंगी मालिकेसाठी कायम ठेवण्यात आला आहे़ ही तिरंगी मालिका १६ जानेवारीपासून खेळविण्यात येणार आहे़ आॅस्ट्रेलियाचे राष्ट्रीय निवडकर्ते रॉड मार्श म्हणाले, विश्वचषकासाठी क्लार्कचीच कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे; मात्र त्याआधी त्याला तंदुरुस्त चाचणीला सामोरे जावे लागेल़ जर विश्वचषकापर्यंत क्लार्क तंदुरुस्त झाला नाही, तर संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी जॉर्ज बेली याच्याकडे सोपविण्यात येईल़ आॅस्ट्रेलिया संघात झेविअर डोहर्टी अनुभवी फिरकी गोलंदाज असल्यामुळे नॅथन लियॉनला संधी मिळाली नाही, असेही मार्श यांनी सांगितले़ क्लार्क मुकण्याची शक्यता आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क याला आॅस्ट्रेलियन निवड समितीने फिटनेस सिद्ध करण्यासाठी अल्टीमेटम दिले आहे़ दिलेल्या मुदतीत फिटनेस सिद्ध न केल्यास क्लार्कला विश्वचषक स्पर्धेला मुकावे लागणार आहे़ मात्र त्याला २१ फेब्रुवारीपर्यंत फिटनेस सिद्ध करण्याची मुदत दिली आहे़ (वृत्तसंस्था)आॅस्ट्रेलिया संघ पुढीलप्रमाणे : माईकल क्लार्क (कर्णधार), जॉर्ज बेली (उपकर्णधार), पेट कमिन्स, झेविअर डोहर्टी, जेम्स फॉल्कनर, अ‍ॅरोन फिंच, ब्रॅड हॅडिन, जोश हेजलवूड, मिशेल जॉन्सन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर व शेन वॉटसऩ