शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

चेन्नईसमोर कोलकाताचे आव्हान

By admin | Updated: October 4, 2014 01:47 IST

चेन्नई सुपरकिंग्जचा संघ शनिवारी चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पध्रेच्या फायनलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सशी भिडणार आहे.

बंगलोर : चेन्नई सुपरकिंग्जचा संघ शनिवारी चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पध्रेच्या फायनलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सशी भिडणार आहे. आत्तार्पयत स्पध्रेत अपराजित राहिलेल्या कोलकातावर विजय मिळवणो चेन्नईसाठी तितकेसे सोपे नाही. याआधी हे दोन्ही संघ 2क्12मध्ये इंडियन प्रीमिअर लीगच्या अंतिम सामन्यात आमने-सामने आले होते आणि त्यात कोलकाताने बाजी मारली होती. असे असले, तरी कोलकाताचा हुकमी एक्का सुनील नरीन फायनलमध्ये खेळणार नसल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. 
यंदाच्या आयपीएलमध्ये हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध 1-1 सामना जिंकले आहेत. बंगलोरच्या स्टेडियमवर चेन्नईने अधिक सामने खेळले असल्याने येथील परिस्थितीचा त्यांना चांगलाच अंदाज आहे. त्याचाच फायदा त्यांना शनिवारी मिळेल. तरीही आकडय़ांवर नजर टाकल्यास कोलकाता संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. संघाने या स्पध्रेत एकही लढत गमावलेली नाही आणि त्यांनी सलग 14 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे चेन्नईने आपल्या प्रतिस्पर्धीवर सहज विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 
कोलकाताकडे गौतम गंभीर, रॉबिन उथप्पा, जॅक कॅलिस आणि मनीष पांडेसारखे अनुभवी व दमदार फलंदाज आहेत आणि ते फॉर्मातही आहेत. गोलंदाजीत त्यांना नरीनची उणीव भासणार असली, तरी त्यांच्याकडे कुलदीप यादव व युसूफ पठाण, रियान टेन डोएशे आणि आंद्रे रसेल हे अष्टपैलू खेळाडू आहेत. दुसरीकडे चेन्नई संघात ड्वेन स्मिथ, ब्रँडम मॅक्युलम, सुरेश रैना हे फलंदाज आहेत. ड्वेन ब्राव्हो व रवींद्र जडेजा हे  अष्टपैलू खेळाडू त्यांचा हुकमी एक्का आहे. त्यांच्या जोडीला गोलंदाजीत आशिष नेहरा, आर अश्विन, मोहित शर्मा हे असल्याने संघाची बांधणी मजबूत झालेली आहे. (वृत्तसंस्था)