किवींनी आफ्रिकेला लोळवले!

By Admin | Updated: March 25, 2015 02:39 IST2015-03-25T02:39:00+5:302015-03-25T02:39:00+5:30

अखेरच्या षटकात ग्रांट इलियटने डेल स्टेनच्या पाचव्या चेंडूवर षटकार खेचून न्यूझीलंडला थरारक विजय मिळवून दिला आणि आॅकलंडच्या स्टेडियममध्ये उपस्थित सुमारे ४५ हजार चाहत्यांनी विजयी जल्लोष केला.

Kiwi lifts Africa! | किवींनी आफ्रिकेला लोळवले!

किवींनी आफ्रिकेला लोळवले!

न्यूझीलंड फायनलमध्ये; आफ्रिका पुन्हा ठरली चोकर्स
अखेरच्या षटकात ग्रांट इलियटने डेल स्टेनच्या पाचव्या चेंडूवर षटकार खेचून न्यूझीलंडला थरारक विजय मिळवून दिला आणि आॅकलंडच्या स्टेडियममध्ये उपस्थित सुमारे ४५ हजार चाहत्यांनी विजयी जल्लोष केला. षटकार ठोकल्यानंतर स्टेनच्या अंगातील त्राण गेले. मात्र खिलाडू वृत्ती दाखवत इलियटने त्याचे सांत्वन केले.

भेदरली आफ्रिका
न्यूझीलंडसमोर तगडे आव्हान असतानाही त्यांच्या फलंदाजांनी आफ्रि केच्या धडाडत्या गोलंदाजांना तुडवून काढले. त्यामुळे आफ्रिका चांगलीच भेदरलेली दिसली. त्यांनी धावबाद करण्याच्या दोन संधी सोडल्या; शिवाय मोक्याच्या क्षणी दोन सोपे झेलही सोडले. जगात ज्या संघाचे क्षेत्ररक्षण प्रमाण मानले जाते, त्या आफ्रिकेची न्यूझीलंडसमोर भंबेरी उडाली. सामना गमावण्यासाठी हीच कारणे पुरेसी ठरली.

 

Web Title: Kiwi lifts Africa!