खालिन जोशी संयुक्त सातव्या स्थानी

By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:10+5:302015-08-02T22:55:10+5:30

Khalin Joshi joint seventh place | खालिन जोशी संयुक्त सातव्या स्थानी

खालिन जोशी संयुक्त सातव्या स्थानी

>चांग हवा (चीनी ताईपे): भारतीय गोल्फर खालिन जोशी अंतिम फेरीमध्ये पार ७२ च्या स्कोअरसह ताइफोंग ओपनमध्ये संयुक्त सातव्या स्थानावर राहिला़ जोशीचे एकूण स्कोअर सात अंडर २८१ राहिले़ त्याला या कामगिरीबद्दल ४२६६ डॉलर बक्षीस मिळाले़ थायलंडचा युवा रतानोव वानाश्रीचनने अंतिम फेरीमध्ये सात अंडर ६५ च्या स्कोअरसह आपला पहिला आशियाई डेव्हलपमेंट टूर किताब जिंकला़ २० वर्षीय रतानोनचे एकूण स्कोअर १२ अंडर २७६ इतके राहिले़ त्याने अमेरिकेच्या कॅसी ओटोले (६६) आणि कालपर्यंत अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन शेराट (७१) ला एका शॉटने पिछाडीवर सोडले़

Web Title: Khalin Joshi joint seventh place