शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

केर्बर बनली ‘यूएस’ क्विन

By admin | Updated: September 12, 2016 00:53 IST

जर्मनीच्या एंजेलिक केर्बरने २०१६ मधील यशाची वाटचाल कायम राखताना यूएस ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद पटकावले आणि जागतिक क्रमवारीत अव्वल खेळाडू ठरल्याचा आनंद साजरा केला.

न्यूयॉर्क : जर्मनीच्या एंजेलिक केर्बरने २०१६ मधील यशाची वाटचाल कायम राखताना यूएस ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद पटकावले आणि जागतिक क्रमवारीत अव्वल खेळाडू ठरल्याचा आनंद साजरा केला. यंदा वर्षाच्या सुरुवातीला आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत जेतेपद पटकाविणाऱ्या दुसऱ्या मानांकित कर्बरने अंतिम लढतीत १०वे मानांकनप्राप्त झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना पिलिस्कोव्हाची झुंज ६-३, ४-६, ६-४ ने मोडून काढली. पिलिस्कोव्हा वेगवान सर्व्हिस व भेदक फटक्यांसाठी ओळखली जाते. तिने केर्बरला घाम गाळण्यास भाग पाडले, पण ४७ टाळण्याजोग्या केलेल्या चुका निकालातील अंतर स्पष्ट करणाऱ्या ठरल्या. पिलिस्कोव्हाने ४० विनर्स लगावले; पण तिच्या चुका वरचढ ठरल्या. निर्णायक सेटमध्ये पिलिस्कोव्हाचा फोरहँडचा फटका कोर्टबाहेर पडल्यानंतर कर्बरचा विजय निश्चित झाला. विजयानंतर केर्बरने आनंद व्यक्त केला. केर्बरने प्रशिक्षक टोर्बेन बेल्ज बसलेल्या बॉक्समध्ये धाव घेतली. त्यानंतर मैदानावर परतली व आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. केर्बरने प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत खेळण्याचा अनुभवाचा लाभ घेतला. बेसलाईनवर तिने चांगला खेळ केला. पहिल्या सेटमध्ये पिलिस्कोव्हाने दुहेरी चूक केल्यामुळे कर्बरला सेट पॉर्इंट मिळाला. केर्बरने फोरहँडच्या फटक्यावर गुण वसूल करीत ४४ मिनिटांमध्ये हा सेट जिंंकला. पिलिस्कोव्हाने त्यानंतर भेदक सर्व्हिस व आक्रमक फटक्यांच्या जोरावर दुसऱ्या सेटमध्ये केर्बरवर वर्चस्व गाजविले. पिलिस्कोव्हाने पहिला ब्रेक पॉर्इंट घेत ४-३ अशी आघाडी घेतली. तीन गेमनंतर सेट पॉर्इंटसाठी सर्व्हिस करताना पिलिस्कोव्हाने सामन्यातील चौथ्या एसची नोंद केली व त्यानंतर आक्रमक फटका खेळत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये मात्र पिलिस्कोव्हाला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. पिलिस्कोव्हाला यापूर्वी ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत तिसऱ्या फेरीच्या पुढे मजल मारता आली नव्हती. यावेळी अंतिम फेरी गाठताना पिलिस्कोव्हाने व्हीनस व त्यानंतर सेरेना विलियम्सचा पराभव केला. एका ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत विलियम्स भगिनींचा पराभव करणारी केर्बर चौथी खेळाडू ठरली आहे. (वृत्तसंस्था)