शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डीतला महागडा ‘चिल्लर’

By admin | Updated: May 14, 2016 01:55 IST

यू मुंबाकडून आपली चमक दाखविलेल्या या स्टार खेळाडूला बंगळुरु बुल्स संघाने तब्बल ५३ लाख रुपयांची किंमत देऊन आपल्या संघात घेतले.

प्रो-कबड्डी लिलाव : मोहितवर लागली ५३ लाखांची बोली, अत्राचली बंगालकडेमुंबई : प्रो-कबड्डीच्या चौथ्या सत्रासाठी शुक्रवारी झालेल्या खेळाडूंच्या लिलावामध्ये स्टार डिफेंडर मोहित चिल्लर याने जबरदस्त वर्चस्व राखले. यू मुंबाकडून आपली चमक दाखविलेल्या या स्टार खेळाडूला बंगळुरु बुल्स संघाने तब्बल ५३ लाख रुपयांची किंमत देऊन आपल्या संघात घेतले. त्याचवेळी गतविजेत्या पटना पायरेट्सचा अनुभवी संदीप नरवालला तेलगू टायटन्सने ४५.५ लाखांच्या किमतीत आपल्या चमूत घेतले.मुंबईतील एका पंचताराकित हॉटेलमध्ये झालेल्या या लिलावात महाराष्ट्राच्या खेळाडूंचा विचार करता नितीन मदने २५ लाखांसह सर्वाधिक महागडा ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशाल मानेला व बाजीराव होगडे यांनीही अनुक्रमे २४ व २० लाखांची बोली लागल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या या तिन्ही महागड्या खेळाडूंना बंगाल वॉरियर्सने आपल्या संघात घेतले.या लिलावाचा मोठा फटका बसला तो बलाढ्य यू मुंबा संघाला. यू मुंबाला चार प्रमुख डिफेंडर विशाल माने, मोहित चिल्लर, सुरेंदर नाडा आणि फझेल अत्राचली यांना गमवावे लागले. दरम्यान, या चौघांना आपल्या संघात घेण्यासाठी यू मुंबाने जोरदार प्रयत्न केले; परंतु बोली वाढत गेल्यानंतर त्यांना माघार घ्यावी लागली. मोहितसह सुरेंदर नाडालाही बंगळुरुने घेताना आपली बचावफळी भक्कम केली. त्याचवेळी जीवा कुमार आणि राकेश कुमार या अनुभवी खेळाडूंना कायम राखण्यात यू मुंबाला यश आले. त्यामुळे या दोघांसह कर्णधार अनुप कुमार व रिशांक देवाडिगा यांच्यावर यू मुंबाची मदार असेल. पहिल्या सत्रात मिळालेल्या किमतीच्या नऊपट अधिक रक्कम यंदा सर्वाधिक महागडा ठरलेल्या मोहितला मिळाली. प्रत्येक संघाला केवळ दोन खेळाडूंना कायम ठेवण्याची मुभा मिळाली होती. (क्रीडा प्रतिनिधी)या स्पर्धेमुळे खेळाडूंच्या आयुष्यात खूप मोठा फरक आलेला आहे. पहिल्या सत्राच्या तुलनेत यंदाच्या लिलावातून त्यांना मिळत असलेली मोठी किंमत पाहून मी खूश आहे. आम्ही चांगल्या खेळाडूंची फळी तयार करण्यात यशस्वी ठरलो, याचा आनंद आहे. - अभिषेक बच्चन, जयपूर पिंक पँथर्स - संघमालकया लिलावातून आम्ही समतोल संघ साधला आहे. खेळाडूंमधील ताळमेळ, नेतृत्त्वक्षमता आणि आक्रमण व बचाव यांच्यात समतोल साधणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. या लिलावातून आम्ही आमचे काही खेळाडू गमावले असले तरी काही चांगले खेळाडू संघात घेतलेही आहेत. - रॉनी स्क्रुवाला, यू मुंबा - संघमालकप्रो कबड्डी लीगची लोकप्रियता वाढली आहे. आतापर्यंत एकूण ९६ देशांमध्येही स्पर्धेचे प्रसारण होत आहे. या स्पर्धेत पाकिस्तानही आपल्या खेळाडूंना खेळविण्यास उत्सुक आहे. परंतु, सध्या पाकिस्तानच्या खेळाडूंविरोधात असलेले वातावरण पाहता त्यांच्या सहभागाविषयी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. परंतु, पाकिस्तानमध्ये या लीगची लोकप्रियता तुफान आहे. त्यांच्याकडे सर्कल कबड्डी चॅम्पियनशीप स्पर्धा होते, मात्र तरीही प्रो कबड्डीची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. प्रो कबड्डीचे आतापर्यंत केवळ तीन सत्र झालेले आहेत आणि पुढे नक्कीच चित्र बदलेल याचा विश्वास आहे.- चारू शर्मा, मशाल स्पोर्टस्, संचालक> सर्वाधिक बोली लागलेले मुख्य खेळाडूखेळाडूनवीन संघजुना संघ किंमत१. मोहित चिल्लरबंगळुरु बुल्सयू मुंबा५३ लाख२. संदीप नरवालतेलगू टायटन्स पटना पायरेट्स४५.५ लाख३. जीवा कुमारयू मुंबायू मुंबा४० लाख४. फझल अत्राचलीपटना पायरेट्सयू मुंबा३८ लाख५. जसमेर सिंग गुलियातेलगू टायटन्सपुणेरी पलटन ३५.५ लाख६. शब्बीर बापू पटना पायरेट्सयू मुंबा३२.२ लाख७. कुलदीप सिंगपटना पायरेट्सजयपूर पिंक पँथर्स ३०.४ लाख८. सुरेंदर नाडाबंगळुरु बुल्सयू मुंबा३० लाख९. धरमराज चेरालथनपटना पायरेट्सतेलगू टायटन्स२९ लाख१०. राकेश कुमारयू मुंबा यू मुंबा २६ लाख११. नितीन मदने बंगाल वॉरियर्स बंगाल वॉरियस२५ लाख१२. विशाल माने बंगाल वॉरियर्स यू मुंबा२४ लाख१३. बाजीराव होडगे पटना पायरेट्सबंगाल वॉरियर्स २० लाख१४. अजय ठाकूरपुणेरी पलटन पुणेरी पलटन१९ लाख