दुहेरीतील खेळाडूंची कामगिरी सुधारण्यावर भर : ज्वाला गुट्टा

By Admin | Updated: July 7, 2017 01:09 IST2017-07-07T01:09:45+5:302017-07-07T01:09:45+5:30

कोचची नवी भूमिका स्वीकारणारी ज्वाला गुट्टा दुहेरीतील खेळाडूंच्या कामगिरीवर समाधानी नाही. कोच या नात्याने खेळाडूंच्या

Jwala Gutta emphasized on improving performance of double players | दुहेरीतील खेळाडूंची कामगिरी सुधारण्यावर भर : ज्वाला गुट्टा

दुहेरीतील खेळाडूंची कामगिरी सुधारण्यावर भर : ज्वाला गुट्टा

हैदराबाद : कोचची नवी भूमिका स्वीकारणारी ज्वाला गुट्टा दुहेरीतील खेळाडूंच्या कामगिरीवर समाधानी नाही. कोच या नात्याने खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा घडवून आणण्यास आपले प्राधान्य असेल असे ज्वालाने म्हटले आहे.
ज्वाला म्हणाली, ‘भारतीय बॅडमिंटन संघटनेचे नवे प्रशासन खेळाडूंच्या विचाराप्रती सकारात्मक असल्याचे समाधान आहे. मला कोचची नवी जबाबदारी सोपविण्यात आल्यापासून दुहेरीत देशासाठी आणखी काय नवे करता येईल, याचा विचार मनात डोकावत आहे.’ २०११ च्या विश्वचॅम्पियनशिपची कांस्यविजेती ज्वालाची भारतीय बॅडमिंटन संघटनेने महिला दुहेरीची कोच म्हणून निवड केली आहे. ज्वाला पुढे म्हणाली, ‘आमचे खेळाडू एकेरीत फारच प्रभावी कामिगरी करत आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Jwala Gutta emphasized on improving performance of double players