शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
4
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
5
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
6
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
7
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
8
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
9
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
10
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
11
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
12
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
13
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
14
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
15
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
16
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
17
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
18
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
19
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
20
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
Daily Top 2Weekly Top 5

जोशने मारले, उमेशने तारले

By admin | Updated: December 19, 2014 01:18 IST

पहिल्या दिवशी सामन्यावर मजबूत पकड घेणा-या भारतीय संघाचा डाव दुसऱ्या दिवशी ४ बाद ३११ धावांवरून सर्वबाद ४०८ धावांवर आपटला.

ब्रिस्बेन : पहिल्या दिवशी सामन्यावर मजबूत पकड घेणा-या  भारतीय संघाचा डाव दुसऱ्या दिवशी ४ बाद ३११ धावांवरून सर्वबाद ४०८ धावांवर आपटला. आॅस्ट्रेलियाकडून पहिलीच कसोटी खेळणाऱ्या जोश हेजलवुडच्या भेदक माऱ्याने पाहुण्यांना हैराण केले. उपाहारापर्यंत भारताचे सहा फलंदाज ८७ धावांवर माघारी परतले आणि मजबूत स्थितीकडे वाटचाल करणारा भारतीय संघ ढेपाळला. मात्र, उमेश यादवने तीन विकेट्स घेत भारताला सामन्यात कमबॅक करण्याची संधी मिळवून दिली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी यजमानांच्या ४ बाद २२१ धावा झाल्या असून ते १८७ धावांनी पिछाडीवर आहेत.
अजिंक्य रहाणे व रोहित शर्मा या सेट फलंदाजांच्या बळावर दुसऱ्या दिवशी भारत मोठी धावसंख्या सहज उभी करेल असे अंदाज बांधले जाऊ लागले. मात्र, प्रत्यक्षात घडले वेगळेच. तिसऱ्याच षटकात शतकाची आस लावून बसलेल्या रहाणेला हेजलवुडने यष्टिरक्षक हॅडिनकरवी झेलबाद केले. त्यापाठोपाठ रोहितही शेन वॉटसनच्या गोलंदाजीवर माघारी परतला आणि बघताबघता भारत बॅकफुटवर गेला. सातव्या विकेटसाठी आर. अश्विन आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी ११.१ षटकांत जवळपास पाचच्या सरासरीेने धावा चोपून ५७ धावांची भागीदारी केली. या जोडीला हेजलवुडची नजर लागली. हेजलवुडच्या गोलंदाजीवर दोन्ही फलंदाज माघारी परतताच भारताचा डाव ४०८ धावांत संपुष्टात आला. हेजलवुडने पदार्पणातच ५ विकेट्स घेण्याची किमया केली.
आॅस्ट्रेलियाची सुरुवात हवी तशी झाली नसली तरी सामन्यावर त्यांची पकड मजबूत होत होती. पहिल्या कसोटीत अपयशी ठरलेल्या ख्रिस रॉजर्स आणि फॉर्मात असलेल्या डेव्हिड वॉर्नर यांनी संयमी खेळ करून संघाला ४७ धावांची सलामी दिली. पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत शतक ठोकणारा वॉर्नर उमेश यादवचा पहिला शिकार ठरला. यादवच्या बाऊंसरवर पुल मारण्याचा प्रयत्न वॉर्नरकडून फसला आणि चेंडू पहिल्या स्लिपला उभ्या असलेल्या आर. अश्विनच्या दिशेने टोलावला. अश्विनने धावत अगदी सहजपणे चेंडू झेलून वॉर्नरला तंबूत जाण्यास भाग पाडले. भारतासाठी ही विकेट मोठी दिलासा देणारी होती. याहून मोठा दिलासा भारताला २०व्या षटकात मिळाला. भारतासाठी नेहमी घातक ठरणाऱ्या शेन वॉटसनला आर. अश्विनने चुकीचा फटका मारण्यास भाग पाडले. अश्विनने टाकलेला चेंडू वॉटसनने पुढे येत मिड आॅनवरून तो सीमारेषेपलीकडे मारण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचा फटका चुकला आणि मिड आॅनवर उभ्या असलेल्या शिखर धवनने झेल टिपून त्याला बाद केले. दुसऱ्या बाजूला रॉजर्स खेळपट्टीवर चिटकून होता आणि त्याने अर्धशतक पूर्ण केले. यादवच्या लेग साईडला जाणाऱ्या चेंडूला छेडण्याच्या नादात रॉजर्स यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनी याच्या हातात सोपा झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर शॉन मार्श आणि कर्णधार स्टीवन स्मिथ या जोडीने चौथ्या विकेटसाठी ८७ धावा जोडल्या. ही जोडी मोठी खेळी करेल असे वाटत असतानाच ४६व्या षटकात यादवने मार्शला बाद केले. यादवच्या बाऊंसरचा अंदाज मार्शला घेता आला नाही आणि स्लिपला उभ्या असलेल्या अश्विनने अप्रतिम झेल टिपून त्याला माघारी जाण्यास भाग पाडले. त्यानंतर स्मिथने एक बाजू लावून धरत अर्धशतक पूर्ण करून संघाला दिवसअखेर ४ बाद २२१ धावांपर्यंत मजल मारून दिली. (प्रतिनिधी)