शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘जोको’ ग्रॅण्डस्लॅमचा किंग

By admin | Updated: September 15, 2015 03:27 IST

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने अमेरिकन ओपनच्या अंतिम लढतीत ग्रॅण्डस्लॅमचा किंग असलेल्या रॉजर फेडररचा ६-४, ५-७, ६-४, ६-४ ने पराभव

न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने अमेरिकन ओपनच्या अंतिम लढतीत ग्रॅण्डस्लॅमचा किंग असलेल्या रॉजर फेडररचा ६-४, ५-७, ६-४, ६-४ ने पराभव करीत यंदाच्या मोसमातील तिसरे आणि कारकिर्दीतील दहावे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकाविले. पावसाच्या व्यत्ययामुळे तीन तासाचा विलंब आणि आर्थर अ‍ॅश स्टेडियममध्ये फेडररचा उत्साह वाढविण्यासाठी जमलेल्या प्रेक्षकांचे आव्हान पेलताना जोकोव्हिचने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत दुसऱ्यांदा जेतेपदाचा मान मिळवला. यापूर्वी २०११ मध्ये जोकोव्हिचने येथे जेतेपदाचा मान मिळवला होता. या पराभवामुळे ३४ वर्षीय फेडररचे ४५ वर्षांतील सर्वांत प्रौढ खेळाडू म्हणून अमेरिकन ओपनचे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले. तब्बल १७ ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद गाठीशी असलेल्या फेडररने २०१२ मध्ये विम्बल्डन स्पर्धेत अखेरचे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावले होते. जोकोव्हिचने यंदाच्या मोसमात आॅस्ट्रेलियन ओपन व विम्बल्डन स्पर्धेतही जेतेपदाचा मान मिळवला आहे. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत त्याला अंतिम लढतीत स्टॅनिसलास वावरिंकाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे त्याची कॅलेंडर ग्रॅण्डस्लॅम पूर्ण करण्याची संधी हुकली. जोकोव्हिचने १० ग्रॅण्डस्लॅम पटकावताना अमेरिकेच्या बिल टिल्डेनच्या विक्रमाची बरोबरी केली. जोकोव्हिच ब्योर्न ब्योर्ग व रॉड लावेर यांच्या विक्रमापासून एक ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद दूर आहे. अंतिम लढतीत फेडररने ५४ टाळण्याजोग्या चुका केल्या आणि त्याला २३ पैकी केवळ चार ब्रेक पॉर्इंटवर गुण वसूल करता आले. सामन्यानंतर बोलताना जोकोव्हिच म्हणाला, ‘मी फेडरर व त्याच्याकडून मिळणाऱ्या आव्हानांचा आदर करतो.’ आता फेडरर व जोकोव्हिच यांची एकमेकांविरुद्ध जय-पराजयाची आकडेवारी २१-२१ अशी बरोबरीत आहे. (वृत्तसंस्था)फेडररची २८ सेट जिंकण्याची मालिका खंडीत....जोकोव्हिचने पहिल्या सेटपासून वर्चस्व गाजवले. गेल्या सहा वर्षांत प्रथमच अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत खेळणारा पाचवेळचा विजेता फेडररने सहा मिनिटच्या पहिल्या गेममध्ये तीन ब्रेक पॉर्इंटचा बचाव करण्यात यशस्वी ठरला. जोकोव्हिचने त्यानंतर फेडररची सर्व्हिस भेदली. पावसामुळे कोर्ट निसरडे झाल्यामुळे जोकोव्हिच पुढच्या गेममध्ये कोर्टवर घसरून पडला, पण त्याचा त्याच्या खेळावर कुठलाच परिणाम झाला नाही. दहाव्या गेममध्ये फेडररचा बॅकहँडचा फटका नेटमध्ये गेल्यामुळे जोकोव्हिचने पहिल्या सेटमध्ये सरशी साधत आघाडी घेतली. त्यामुळे विम्बल्डनच्या अंतिम लढतीत जोकोव्हिचविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर फेडररची सलग २८ सेट जिंकण्याची मालिका खंडित झाली. दुसऱ्या सेटमध्ये जोकोव्हिचने आठ मिनिटांच्या गेममध्ये पाच ब्रेक पॉर्इंटचा बचाव केला.फेडररला दहाव्या गेममध्ये दोन सेट पॉर्इंट मिळाले. त्यातील एक त्याने गमावला. फेडररने १२ व्या गेममध्ये आणखी एक सेट पॉर्इंट गमावला, पण चौथ्या ब्रेक पॉर्इंटवर गुण वसूल करीत सेट जिंकला. फेडररने १-१ अशी बरोबरी साधल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्साह संचारला. तिसऱ्या सेटममध्ये जोकोव्हिचने २-१ अशी आघाडी घेतली होती, पण सर्व्हिस करताना प्रेक्षकांनी त्याचे लक्ष भंग केल्यामुळे स्कोअर २-२ असा झाला. जोकोव्हिचने आठव्या गेममध्ये दोन ब्रेक पॉर्इंटचा बचाव केला, पण त्यानंतर अचानक फेडररचे लक्ष विचलित झाल्यामुळे जोकोव्हिचने ५-४ अशी आघाडी घेतली. फेडररला दोन ब्रेक पॉर्इंटचाही लाभ घेता आला नाही. चौथ्या सेटच्या पहिल्या गेममध्ये जोकोव्हिचने फेडररची सर्व्हिस भेदली आणि त्यानंतर ब्रेंक पॉर्इंटचा बचाव करीत ४-२ अशी आघाडी घेतली.