राज्यस्तरीय टेनिस स्पर्धेत जैष्णव शिंदेला विजेतेपद

By Admin | Updated: December 8, 2015 00:03 IST2015-12-08T00:03:33+5:302015-12-08T00:03:36+5:30

नाशिक : नुकत्याच सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत नाशिकच्या जैष्णव शिंदे याने विजेतेपद पटकावले. सोलापूर लॉन टेनिस संघटनेच्या वतीने कुमठा नाका येथील क्रीडा संकुलात या टेनिस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम फेरीत नाशिकचा जैष्णव शिंदेने मुंबईच्या प्रथम मानांकित आदित्य अय्यरचा अत्यंत अटीतटीच्या लढतीत ४-२, १-४, ४-३ अशा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात कोल्हापूरच्या प्रथम मानांकित सोनल पाटीलने मुंबईच्या दुसर्‍या मानांकित कायरा शे˜ीचा ५-३ व ४-१ अशा सरळ सेटमध्ये पराभव करीत विजेतेपद पटकावले. पारितोषिक वितरण महेश मुलगे व हेमा मुलगे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व चषक देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी नेविल पिठावाला, राजीव देसाई व डॉ. वकुल जहागीरदार उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Jnanav Shinde won the state-level tennis tournament | राज्यस्तरीय टेनिस स्पर्धेत जैष्णव शिंदेला विजेतेपद

राज्यस्तरीय टेनिस स्पर्धेत जैष्णव शिंदेला विजेतेपद

नाशिक : नुकत्याच सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत नाशिकच्या जैष्णव शिंदे याने विजेतेपद पटकावले. सोलापूर लॉन टेनिस संघटनेच्या वतीने कुमठा नाका येथील क्रीडा संकुलात या टेनिस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम फेरीत नाशिकचा जैष्णव शिंदेने मुंबईच्या प्रथम मानांकित आदित्य अय्यरचा अत्यंत अटीतटीच्या लढतीत ४-२, १-४, ४-३ अशा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात कोल्हापूरच्या प्रथम मानांकित सोनल पाटीलने मुंबईच्या दुसर्‍या मानांकित कायरा शे˜ीचा ५-३ व ४-१ अशा सरळ सेटमध्ये पराभव करीत विजेतेपद पटकावले. पारितोषिक वितरण महेश मुलगे व हेमा मुलगे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व चषक देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी नेविल पिठावाला, राजीव देसाई व डॉ. वकुल जहागीरदार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जैष्णव शिंदे याचा फोटो एनएसके इडीटवर टाकला आहे.

Web Title: Jnanav Shinde won the state-level tennis tournament