शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

ज्यु. क्रिकेटपटूंसाठी योजना आखण्याची गरज

By admin | Updated: December 2, 2015 04:04 IST

भारतात ज्युनियर क्रिकेटपटूंसाठी पायाभूत सुविधा आणि योजना उभारण्याची गरज असल्याचे मत माजी कर्णधार राहुल द्रविड याने मंगळवारी व्यक्त केले. ज्युनियर स्तरावर वय

नवी दिल्ली : भारतात ज्युनियर क्रिकेटपटूंसाठी पायाभूत सुविधा आणि योजना उभारण्याची गरज असल्याचे मत माजी कर्णधार राहुल द्रविड याने मंगळवारी व्यक्त केले. ज्युनियर स्तरावर वय लपविण्याचे प्रकार आणि संशयास्पद गोलंदाजी थांबविण्यासाठी योजना आखण्याचे द्रविडने बीसीसीआयला आवाहन केले.चौथ्या टायगर पतौडी स्मृती लेक्चर सीरिजमध्ये व्याख्यान देताना द्रविड म्हणाला, ‘‘१९ वर्षे वयाच्या खेळाडूची संशयास्पद गोलंदाजीसाठी तक्रार झाल्याचे ऐकून मला धक्का बसला.’’ त्याची ही शैली चेक करण्यासाठी कोच नव्हते काय? त्याच्या संशयास्पद शैलीची सुरुवात दहा वर्षांआधी झाली होती काय? तो विकेट घेत सामना जिंकून देत असावा, म्हणून कोचने डोळेझाक केली का, असे उद्विग्न प्रश्न द्रविडने विचारले. तो म्हणाला, ‘‘१९ वर्षांचा मुलगा कठोर मेहनत घेत विश्वचषकात खेळत असेल व नंतर संशयास्पद गोलंदाजीसाठी बाहेर काढला जात असेल तर त्याचे निराश होणे स्वाभाविक आहे. अशा प्रकारच्या झटपट निकाल देणाऱ्या घटनांवर भर दिल्याने ज्युनियर स्तरावर अधिक वयाचे खेळाडू खेळण्याचे प्रकार घडत आहेत. हे सर्व तेव्हाच शक्य होते जेव्हा एखादा कोच खेळाडूचे वय बदलून त्याला स्थानिक स्पर्धेत खेळण्याची परवानगी देतो.’’बीसीसीआयने युवा खेळाडूंना आकर्षित करण्याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन करीत द्रविड म्हणाला, ‘‘आम्ही युवा खेळाडूंना आकर्षित करण्याची योजना राबविण्यात अपयशी ठरत असल्याने प्रतिभावान खेळाडू पुढे येताना दिसत नाहीत. क्रिकेटसाहित्याच्या विक्रीत मंदी आल्याचे एका नामांकित क्रिकेटसाहित्य विक्रेत्या कंपनीने तथ्य उलगडले आहे.’’ बीसीसीआयने ज्युनियर स्तरावर चांगल्या योजना तयार कराव्यात; शिवाय मृदुभाषी प्रशिक्षक नेमावेत. ज्युनियर क्रिकेटमध्ये रोटेशन पद्धत अधिक प्रभावी ठरू शकेल. यामुळे खेळाडूंना पुरेशी संधी उपलब्ध होईल. युवा खेळाडू विविध कारणांनी लवकर क्रिकेटकडे पाठ फिरवितात. आई-वडिलांच्या अपेक्षांची पूर्तता न होणे, हे यामागील मोठे कारण आहे. खेळाडूंनी खेळासोबतच शिक्षणात सातत्य राखल्यास ते चांगले नागरिक बनू शकतील, असे तो म्हणाला.(वृत्तसंस्था)एखादा खेळाडू वय लपवून संघात स्थान मिळवीत असेल आणि खेळत असेल तर प्रामाणिक आणि प्रतिभावान खेळाडूवर याचा विपरीत परिणाम होतो. प्रामाणिक खेळाडूला संघातील स्थान गमवावे लागल्याने त्याच्या डोक्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती असते.- राहुल द्रविड