जयश्री ठाकरे भारतीय संघात

By Admin | Updated: December 19, 2014 22:57 IST2014-12-19T22:57:00+5:302014-12-19T22:57:00+5:30

द. आशियाई व्हॉलिबॉल स्पर्धा

Jayshree Thakre in the Indian squad | जयश्री ठाकरे भारतीय संघात

जयश्री ठाकरे भारतीय संघात

द.
आशियाई व्हॉलिबॉल स्पर्धा
जयश्री ठाकरे भारतीय संघात
नागपूर : काठमांडू येथे शुक्रवापासून सुरू झालेल्या अकराव्या दक्षिण आशियाई सिनियर व्हॉलिबॉल स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय महिला व्हॉलिबॉल संघात नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथील जयश्री प्रभाकर ठाकरे हिची निवड झाली आहे. कोलबास्वामी व्हॉलिबॉल क्लबची सदस्य आणि श्रीखंडे महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या जयश्रीने याआधी युवा आणि ज्युनियर गटाच्या भारतीय व्हॉलिबॉल प्रशिक्षण शिबिरात भाग घेतला आहे. तिने ज्युनियर शालेय स्पर्धेत रौप्यपदक जिंकले शिवाय ज्युनियर स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य आणि कांस्य पदकही मिळवून दिले. राज्य व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष विजय डांगरे आणि कोषाध्यक्ष सुनील हांडे यांनी जयश्रीची नवी दिल्ली येथे भेट घेऊन संघटनेच्यावतीने तिला २१ हजाराची प्रोत्साहनपर रक्कम प्रदान केली. जयश्री ही मंगेश धोटे आणि मनोज धकाते यांच्या मार्गदर्शनात सराव करते.(क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Jayshree Thakre in the Indian squad