शहरं
Join us  
Trending Stories
1
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
2
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
3
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
4
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
5
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
6
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
7
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
8
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
9
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
10
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
11
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
12
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
13
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
14
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
15
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
16
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
19
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
20
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
Daily Top 2Weekly Top 5

जवाहरलाल दर्डा शालेय फुटबॉल

By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST

जवाहरलाल दर्डा स्मृती शालेय फुटबॉल स्पर्धा

जवाहरलाल दर्डा स्मृती शालेय फुटबॉल स्पर्धा
अंजुमन, सेंट जॉन्स उपांत्य फेरीत
नागपूर : अंजुमन हायस्कूल आणि सेंट जॉन्स स्कूल संघांनी गुरुवारी जवाहरलाल दर्डा स्मृती शालेय फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेच्यावतीने मध्य रेल्वेच्या अजनी मैदानावर या सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून लोकमत मीडिया प्रा. लिमिटेड हे पुरस्कर्ते आहेत.
अंजुमनने भवन्स श्रीकृष्ण नगर संघावर १-० ने सरशी साधली. सामन्यात निर्णायक ठरलेला गोल मोहम्मद इकराम याने पाचव्या मिनिटाला नोंदविला. सामन्यात नियमबाह्य खेळ केल्याबद्दल रेफ्रीने इकरामला ६६ व्या मिनिटाला तंबी दिली.भवन्सचे जयेश धवल आणि अखिलेश शेळके यांनाही ताकीद देण्यात आली.
सेंट जॉन्सने टायब्रेकरपर्यंत लांबलेल्या अटीतटीच्या लढतीत सेंटर पॉईंट स्कूल दाभाला ४-२ ने नमविले. सामन्यात निर्धारित वेळेत गोलसंख्या ३-३ अशी बरोबरीत होती. रुपेश आत्रामने २६ तसेच आदिब शेख याने ५८ आणि ७५ व्या मिनिटाला सेंट जॉन्सकडून तर रोनित राठी याने सीपीएससाठी तिन्ही गोल चौथ्या, १२ व्या आणि २८ व्या मिनिटाला केले होते. पेनल्टी शूटआऊटमध्ये हाशिम रझा , रुपेश आत्राम, हर्षिल अख्तर आणि साहिल मेश्राम यांनी सेंट जॉन्सकडून गोल केले. सीपीएसकडून कौस्तुभ गोडे आणि रोनित राठी यांनाच गोल नोंदविण्यात यश आले.
कुणाल पेठेच्या चार गोलमुळे के. जॉन संघाने राजेंद्र हायस्कूलचा ५-० ने एकतर्फी पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. पेठेने चौथ्या, १३ व्या, १७ व्या आणि ४४ व्या मिनिटाला संधी शोधली. गौरव बागडे याने ४५ व्या मिनिटाला एक गोल केला. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून एमएम रब्बानी हायस्कूल विरुद्ध के. जॉन स्कूल आणि एसएफएसविरुद्ध मॉन्टफोर्ट स्कूल यांच्यात सामने होतील.
.........................................
कॉलेज लीग फुटबॉल ५ जानेवारीपासून
जवाहरलाल दर्डा स्मृती आंतर महाविद्यालयीन फुटबॉल सामन्यांना ५ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. इच्छूक कॉलेज संघांनी एनडीएफए कार्यालयातून अर्ज प्राप्त करावेत. अधिक माहितीसाठी एनडीएफए सचिव युजीन नॉबर्ट यांचेशी संपर्क करावा, असे आयोजकांनी कळविले आहे.(क्रीडा प्रतिनिधी)
................