शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
3
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
4
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
5
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
6
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
7
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
8
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
9
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
10
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
11
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
12
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
13
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
14
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
15
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
16
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
17
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
18
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
19
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
20
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

धोनीला टार्गेट करणे चुकीचे !

By admin | Updated: October 14, 2015 00:07 IST

उत्कृष्ट ‘फिनिशर’ म्हणून ज्याची ख्याती आहे, त्या महेंद्रसिंह धोनीमुळे आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना गमवावा लागला, अशी ओरड झाल्यानंतर त्याच्या निवृत्तीवरही चर्चा रंगली.

सचिन कोरडे उत्कृष्ट ‘फिनिशर’ म्हणून ज्याची ख्याती आहे, त्या महेंद्रसिंह धोनीमुळे आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना गमवावा लागला, अशी ओरड झाल्यानंतर त्याच्या निवृत्तीवरही चर्चा रंगली. असे असले तरी या खेळाडूमधील ‘जज्बा’ कायम आहे. तोच संघातील खरा ‘मॅच टर्नर’ आहे.सध्या तरी त्याला टार्गेट करणे चुकीचे आहे, असे सध्या भारतीय संघाचे व्यवस्थापक असलेले विनोद फडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ते इंदूर येथून दूरध्वनीवरून बोलत होते. भारतीय संघाचे मंगळवारी इंदूर येथे विमानतळावर शानदार स्वागत करण्यात आले. चाहत्यांच्या स्वागताने खेळाडूंचाही उत्साह वाढला. हाच संघ आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाने खचून गेला होता. हातचा सामना गमावल्याने खेळाडू दु:खी झाले होते; मात्र संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी खेळाडूंना आत्मविश्वासाचे बळ दिले. त्यामुळे होळकर स्टेडियमवर हा संघ नव्या उमेदीने मैदानावर उतरेल, असेही फडके म्हणाले. धोनीपर्व समाप्तीकडे आहे काय, यावर मात्र फडके यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘‘धोनीने विश्वचषक जिंकल्यानंतर निवृत्ती घ्यायला हवी होती, असे मला वाटते. मात्र, हा निर्णय निवड समितीचा आहे. त्याने निवृत्ती घ्यावी, याचा अर्थ त्याच्यातील खेळ संपला, असे नाही. सध्या भारतीय संघातील तोच खरा ‘टर्नर’ आहे.विराट, रैना अपयशीस्टार फलंदाज विराट कोहली आणि सुरेश रैना हेसुद्धा अपयशी ठरले आहेत. या दोघांकडून मोठी अपेक्षा आहे. त्यामुळे पराभवाला एकटा धोनी जबाबदार नाही. इतरांनीही सामना जिंकून द्यायला हवा. दुसरीकडे, भारतीय जलदगती गोलंदाजी कमकुवत आहे. त्यात सुधारणेची गरज आहे. केवळ फिरकीपटूंच्या कामगिरीवर सामना जिंकणे कठीण असते. मोहंमद शमी हा दुखापतग्रस्त असल्याने त्याची कमतरताही संघाला भासत आहे. शमी हा धावांची गती कमी राखण्यास मदत करतो.संघात ‘गटबाजी’ नाही!धोनी आणि विराट कोहली यांचे संघात गट आहेत काय, यावर फडके यांनी संघात एकजूट असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘ड्रेसिंग रूममधील वातावरण ‘फ्रेंडली’ आहे. विराट-धोनी यांच्यात कुठलेही गैरसमज नाहीत. ते केवळ माध्यमांनी तयार केले आहेत. ड्रेसिंग रूमचे नाव राहुल द्रविडहोळकर स्टेडियमवर भारतीय संघासाठी खास ड्रेसिंग रूम तयार करण्यात आली आहे. तिला राहुल द्रविडचे नाव देण्यात आले आहे. सध्या भारतीय संघ ५ सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. त्यामुळे संघाला प्रोत्साहनाची गरज आहे. त्यामुळे मध्य प्रदेश संघटनेने ही खास योजना आखली.