शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण - मुद्गल समितीचा अहवाल सादर

By admin | Updated: November 3, 2014 18:09 IST

जस्टिस मुकुल मुद्गल यांच्या नेतृत्वाखालील समितीने आयपीएल स्पॉट-फिक्सिंग व सट्टेबाजीप्रकरणी अंतिम अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेदरम्यान झालेले स्पॉट-फिक्सिंग व सट्टेबाजीबाबतचा अंतिम अहवाल जस्टिस मुकुल मुद्गल यांच्या नेतृत्वाखालील समितीने सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सादर केला. आयपीएलच्या सहाव्या पर्वात ( साल २०१३) घडलेल्या या स्पॉट फिक्सिंगचा मुद्गल समितीने तपास केला असून एका बंद लिफाफ्यातील हा अहवाल आज न्यायालयात सादर करण्यात आला. 
याप्रकरणी एस. श्रीसंथ, अजित चंडेला आणि अंकित चव्हाण या खेळाडूंसह बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मयप्पन आणि बॉलिवूड अभिनेता विंदू दारा सिंह यांना अटक करण्यात आली होती.  मात्र सध्या ते सर्व जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणातील गुरूनाथ मयप्पन याच्यावरील आरोपांमुळे श्रीनिवास यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले होते, मात्र असे असले तरीही आयसीसीच्या ( इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिल) प्रमुखपदी ते अद्याप कायम आहेत.
या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी जस्टिस मुद्गल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एल. नागेश्वर राव, वकील निलय दत्ता, पोलीस उप महासंचालक (अमली पदार्थ नियंत्रण विभाग) बीबी मिश्रा आणि भारताचा माजी कप्तान सौरव गांगुली यांचा या समितीत समावेश आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी १० नोव्हेंबर रोजी होणार आहे.