शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

कसोटी क्रिकेट संपविण्याचे कारस्थान

By admin | Updated: November 29, 2015 01:29 IST

व्हीसीएच्या जामठा स्टेडियमच्या खेळपट्टीचा अनेक दिग्गजांनी खरपूस समाचार घेतला. माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी या खेळपट्टीवर सडकून टीका केलीच, शिवाय

नवी दिल्ली : व्हीसीएच्या जामठा स्टेडियमच्या खेळपट्टीचा अनेक दिग्गजांनी खरपूस समाचार घेतला. माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी या खेळपट्टीवर सडकून टीका केलीच, शिवाय अशा खेळपट्टीची मागणी करणारा कर्णधार विराट कोहली आणि विकेट तयार करणाऱ्यांना इतिहास माफ करणार नाही, या शब्दांत धारेवर धरले आहे.भारत-द. आफ्रिका यांच्यात शुक्रवारी संपलेल्या तिसऱ्या कसोटीतील खेळपट्टी चर्चेचा केंद्रबिंदू ठरली. ही खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकीला अनुकूल होती. स्थानिक संघाला लाभ देण्याच्या हेतूने ती तयार करण्यात आल्याचे वक्तव्य करीत बेदी म्हणाले, ‘चांगल्या आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्या तयार करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीची आणि विशेष प्रकारच्या मातीची गरज असते; पण येथे काहीही करण्याची गरज भासली नाही. नागपुरात केवळ विकेट बनवायची म्हणून बनविण्यात आली.’ द. आफ्रिका संघाच्या पडझडीनंतर क्रिकेटविश्वात या खेळपट्टीवर अनेक सवाल उपस्थित झाले होते. अशा प्रकारच्या खेळपट्ट्या कसोटी क्रिकेटला संपविण्यास पूरक असल्याची टीका करीत ६९ वर्षांचे बेदी पुढे म्हणाले, ‘भारताने द. आफ्रिकेला पराभूत केले, पण त्यात काय अर्थ आहे. आयपीएलने कसोटी क्रिकेटला संपविले. अशा प्रकारच्या खेळपट्ट्या कसोटीला पूर्णपणे संपवीत आहेत. नागपूर कसोटी बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती आणि आयसीसीच्या क्रिकेटविषयक समितीचे अध्यक्ष अनिल कुंबळे सामन्याचे समालोचक होते. स्वत: भारताचा दुसरा डाव १७३ धावांत आटोपला याचा अर्थ काय!’सामन्यात १२ गडी बाद करणारा रविचंद्रन अश्विन याच्याबद्दल बेदी म्हणाले, ‘अश्विन परिपक्वगोलंदाज असल्याने त्याला बळी घेण्यासाठी अशाप्रकारच्या खेळपट्ट्यांची गरज नाही. अशा खेळपट्ट्या बनवून तुम्ही अश्विनची प्रतिभा संपवीत आहात. रवींद्र जडेजाला अशा खेळपट्ट्यांची गरज असेल; पण अश्विनला मुळीच नाही.’ कारकिर्दीत ६७ कसोटी आणि दहा वन-डे सामन्यांत डावखुरे फिरकीपटू बेदी यांनी दोन्ही प्रकारांत २७३ गडी बाद केले आहेत. (वृत्तसंस्था)मी लहान तोंडी मोठा घास घेणार नाही. डग्लस जॉर्डिन याने १९३२-३३ मध्ये बॉडी लाईन गोलंदाजी आणली. क्रिकेटविश्वाला त्याला उत्तर देणे भाग पडले. कोहलीला देखील असेच उत्तर द्यावे लागेल. आम्ही कसोटी क्रिकेट संपवीत आहोत. पडद्यामागे ज्यांची यात भूमिका आहे, त्यात कोहलीदेखील तितकाच जबाबदार ठरतो. - बिशनसिंग बेदी, माजी कर्णधार