शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय पर्यवेक्षक येणार

By admin | Updated: September 9, 2014 03:46 IST

२0१२ ला बॉक्सिंग महासंघाला निलंबित केल्यानंतर या वर्षाच्या प्रारंभी भारतीय बॉक्सिंचा कारभार पाहण्यासाठी बॉक्सिंग इंडियाला मान्यता देण्यात आली होती.

नवी दिल्ली : भारतात नवीन बॉक्सिंग महासंघ स्थापन करण्यासाठी ११ सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. वादग्रस्त ठरलेल्या आणि चारवेळा चालढकल झालेल्या या निवडणुकीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेचा (एआयबीए) पर्यवेक्षक उपस्थित राहणार आहे.स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक पार पाडण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. २0१२ ला बॉक्सिंग महासंघाला निलंबित केल्यानंतर या वर्षाच्या प्रारंभी भारतीय बॉक्सिंचा कारभार पाहण्यासाठी बॉक्सिंग इंडियाला मान्यता देण्यात आली होती. बॉक्सिंग इंडियाच्या बॅनरखाली ही निवडणूक होत आहे.बॉक्सिंग इंडियाचे सदस्य उदित सेठ म्हणाले, 'एआयबीएच्या कायदेशीर विभाग सांभाळणार्‍या क्लियोधना गॉय या ११ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार्‍या निवडणुकीवर लक्ष ठेवतील. त्या निवडणूक प्रक्रियेचा अहवाल तयार करणार असून आणि संपूर्ण हालचालीचे व्हिडिओ चित्रण करणार आहेत. सर्वच राष्ट्रीय महासंघांच्या निवडणुका आंतरराष्ट्रीय पर्यवेक्षकांच्या उपस्थितीत होतात. मतदान गुप्त पद्धतीने होणार असून, त्याचे व्हिडिओ चित्रण केले जाईल. निवडणूक अधिकारी हे उच्च न्यायालयाचे सेवानवृत्त न्यायाधीश आहेत. पारदश्रीपणा राखण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत.'याशिवाय बॉक्सिंग इंडियाने क्रीडा मंत्र्यांनादेखील एक पर्यवेक्षक पाठविण्याची विनंती केली. एक अधिकारी म्हणाला, 'गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी प्रयत्न करीत असल्यामुळे क्रीडा मंत्रालयाचा प्रतिनिधी बोलविण्यात आला आहे. आधी निवडणूक ९ जुलै रोजी होणार होती. पण अनेक राज्यांनी बॉक्सिंग इंडियाच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केल्याने निवडणूक लांबणीवर पडली. बॉक्सिंग इंडिया माजी प्रशासकीय आधिकारी आणि कॉर्पोरेट जगतातील लोकांचा गट आहे. भारतीय बॉक्सिंगचे प्रायोजक मोनेट इस्पातचे चेअरमन संदीप जाजोदिया हे अध्यक्षपदी आधीच बिनविरोध निर्वाचित झाले आहेत. (वृत्तसंस्था)