शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

पाक फलंदाजीमध्ये सुधारणा करण्यास उत्सुक

By admin | Updated: March 3, 2015 23:44 IST

विश्वकप क्रिकेट स्पर्धेत यूएईविरुद्ध बुधवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत पाकिस्तान संघ नेट रनरेटमध्ये सुधारणा करण्यास उत्सुक आहे.

नेपियर : विश्वकप क्रिकेट स्पर्धेत यूएईविरुद्ध बुधवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत पाकिस्तान संघ नेट रनरेटमध्ये सुधारणा करण्यास उत्सुक आहे. पाकिस्तान संघ या लढतीत मोठ्या फरकाने विजय मिळविण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. पाकिस्तान संघाला विश्वकप स्पर्धेत फलंदाजीमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. भारताविरुद्ध पहिल्या लढतीत ७६ धावांनी पराभव स्वीकारणाऱ्या पाकिस्तान संघाला त्यानंतर वेस्ट इंडीजविरुद्ध १५० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. येथे १९९२ मध्ये विश्वविजेतेपदचा मान मिळविणाऱ्या पाकिस्तान संघाने या वेळी एकमेव विजय रविवारी झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या लढतीत मिळविला आहे. त्या लढतीत पाकिस्तान संघ केवळ २० धावांनी विजय मिळविण्यात यशस्वी ठरला. विजयानंतर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल-हक म्हणाला होता,‘‘यानंतर प्रत्येक लढत आमच्यासाठी बाद फेरीप्रमाणे आहे. आघाडीच्या फळीकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.’’ पाकिस्तान संघाने युनिस खानला डावाची सुरुवात करण्याची संधी दिली, पण हा निर्णय चुकीचा ठरला. वेस्ट इंडीजविरुद्ध सुरुवातीला चार फलंदाज केवळ १ धावेमध्ये तंबूत परतले होते. झिम्बाब्वेविरुद्धही त्यांची २ बाद ४ अशी अवस्था झाली होती. तीन सामने खेळणाऱ्या पाकिस्तानच्या खात्यावर २ गुणांची नोंद आहे. बाद फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानसह वेस्ट इंडीज व आयर्लंड संघांदरम्यान चुरस आहे. दोन्ही गटांतील अव्वल चार संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. पाक संघाचा नेट रनरेट (-१.३७) मायनसमध्ये आहे. त्यांना नेट रनरेटमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. युएईसारख्या कमकुवत संघाविरुद्ध पाकिस्तान लेग स्पिनर यासिर शाह याला संधी देण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नासिर जमशेदच्या स्थानी सलामीवीर म्हणून सरफराज अहमदला संधी देण्याचे संकेत मिळत आहेत.(वृत्तसंस्था)