शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जखमी झालेला पहिलवान झुंझारपणे लढला

By admin | Updated: August 21, 2016 20:27 IST

कुस्ती स्पर्धेत ७४ किलो वजनीगटात पुरुषांच्या फ्री स्टाईल फायनलमध्ये रशियाचा पहिलवान एनियर गेदेवने डोक्यातून रक्त वाहत असतानाही पदक जिंकण्यासाठी लढत चालूच ठेवली

ऑनलाइन लोकमतरियो डि जेनेरिओ, दि. 21 - खेळाडूला आपल्या देशासाठी पदक जिंकणे किती महत्त्वपूर्ण असते त्याचे एक उदाहरण रिओमध्ये पाहावयास मिळाले. रिओ आॅलिम्पिकच्या कुस्ती स्पर्धेत ७४ किलो वजनीगटात पुरुषांच्या फ्री स्टाईल फायनलमध्ये रशियाचा पहिलवान एनियर गेदेवने आपल्या डोक्यातून रक्त वाहत असतानाही पदक जिंकण्यासाठी ही लढत चालूच ठेवली. खेळामध्ये खासकरून अशी घटना कमीच पाहावयास मिळत असते. कारण खेळाडू अथवा अ‍ॅथलिटला दुखापत झाल्यानंतर काही काळ खेळ थांबविण्यात येतो; मात्र गेदेवच्या लढतीत असे झाले नाही़ रशियाचा पहिलवान गेदेव सामन्यादरम्यान पूर्णत: जखमी झाला होता. त्याच्या डाव्या डोळ्याच्या वरील बाजूस दुखापत झाली होती़ त्यातून रक्त प्रवाह सुरु होता़ २९ वर्षीय गेदेव दुखापतीनंतरदेखील ईराणचा पहिलवान हसन यजदानीविरुद्ध खेळण्यास उतरला़ फायनल सामन्यादरम्यान त्याच्या जखमातून रक्त वाहत होते मात्र गेदेव आपल्या देशासाठी सुवर्णपदक जिंकू इच्छित होता़ सामन्यादरम्यान पहिलवानाची जर्सी पूर्णत: लाल झाली होती़ वारंवार रक्ताचे थेंब टपकत असल्या कारणाने मॅटदेखील पुसावे लागत होते़; मात्र प्रबळ इच्छाशक्तीमुळे गेदेवने आपल्या डोक्याला पट्टी बांधून सामना लढत राहिला़ तो पराभव मानणे अथवा माघार घेण्यास सज्ज नव्हता़ तो रिंगणात उभा होता़ पहिल्यांदा तो आघाडीवर होता; मात्र सामन्याच्या अखेरीस यजदानीने स्कोअर बरोबरीत आणले़ यानंतर मॅच रेफरीने ईराणी पहिलवानाला विजेता घोषित केले़ दरम्यान, गेदेव सुवर्ण जिंकू शकला नाही; मात्र त्याने सर्वांचे मन जिंकले एवढे मात्र नक्की़.