भारताचा युकी भांबरी सुसाट

By Admin | Updated: January 16, 2015 03:52 IST2015-01-16T03:52:26+5:302015-01-16T03:52:26+5:30

माजी ज्युनिअर आॅस्ट्रेलियन चॅम्पियन भारताचा युकी भांबरी याने आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीत आपले विजयी अभियान कायम

India's Yuki Bhambari Sujata | भारताचा युकी भांबरी सुसाट

भारताचा युकी भांबरी सुसाट

मेलबर्न : माजी ज्युनिअर आॅस्ट्रेलियन चॅम्पियन भारताचा युकी भांबरी याने आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीत आपले विजयी अभियान कायम राखताना थाटात तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला़ आता युकीला स्पर्धेच्या मुख्य फेरीत जागा मिळविण्यासाठी आणखी एका विजयाची आवश्यकता आहे़
युकीने या सामन्यांत वर्चस्व राखताना पहिला सेट टायब्रेकमध्ये ५४ मिनिटांत जिंकला़ दुसऱ्या सेटमध्येही त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूला तोंड वर करण्याची संधी दिली नाही आणि हा सेट ४६ मिनिटांत नावे करीत सामन्यात बाजी मारली़
भारतीय खेळाडूने या लढतीत चार एस आणि २५ विनर्स लगावले, तर त्याने पाचपैकी २ ब्रेक गुणांची कमाई केली, तर जपानी खेळाडूला ८ पैकी केवळ एका ब्रेक गुणाचीच कमाई करता आली़
युकीला पात्रता फेरीच्या तिसऱ्या लढतीत आता अमेरिकेचा चेस बुकानन याच्याशी झुंजावे लागणार आहे़ बुकाननने दुसऱ्या फेरीच्या सामन्यात क्रोएशियाचा ३२वे मानांकनप्राप्त मेट डेलिकला ४-६, ६-१, ६-४ ने धूळ चारली़
युकी आणि बुकानन पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत़
त्याआधी भारतीय खेळाडू सोमदेव देववर्मन आणि रामकुमार रामनाथन यांना पात्रता फेरीच्या पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळाला लागला होता़ (वृत्तसंस्था)

Web Title: India's Yuki Bhambari Sujata