शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे समाधान रौप्यपदकावर

By admin | Updated: May 27, 2016 03:55 IST

पाकिस्तानला सहजपणे लोळवून अंतिम फेरी गाठलेल्या भारताला बलाढ्य इराणविरुद्ध निसटता पराभव पत्करावा लागल्याने अखेर आशियाई स्नूकर सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदकावर

मुंबई : पाकिस्तानला सहजपणे लोळवून अंतिम फेरी गाठलेल्या भारताला बलाढ्य इराणविरुद्ध निसटता पराभव पत्करावा लागल्याने अखेर आशियाई स्नूकर सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. २-२ अशी बरोबरी झाल्यानंतर निर्णायक लढतीत आदित्य मेहता पराभूत झाल्याने भारताचे सुवर्ण हुकले.अबुधाबी येथे झालेल्या या रोमांचक अंतिम सामन्यात भारताची सुरुवात सकारात्मक झाली. आदित्य मेहताने चुरशीच्या झालेल्या एकेरी लढतीत आमीर सरकोशला ६५-५३ असे नमवून भारताला १-० असे आघाडीवर नेले. मात्र, यानंतर भारताला मोठा झटका बसला. इराणच्या सोहेल वाहेदीने अनपेक्षित बाजी मारताना पंकज अडवाणीचा ५४-७ असा दणदणीत पराभव करून बरोबरी साधली. दुहेरी लढतीतही भारताला मोठा झटका बसला. एकतर्फी झालेल्या या लढतीत आमीर व सोहेल या जोडीने एकहाती वर्चस्व राखताना आदित्य - पंकज यांना ७७-१ असा धक्का देत २-१ अशी आघाडी घेतली. यानंतरच्या एकेरी लढतीत पंकजने भारताला बरोबरी साधून देत आमीर सरकोशचा ६९-६४ असा पाडाव करून सामना पाचव्या लढतीत नेला. या निर्णायक लढतीत आदित्य पराभूत झाल्याने भारताचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले.