शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई स्पर्धेत भारताचा सुवर्ण चौकार, कुस्तीमध्ये योगेश्वरचा गोल्डन पंच

By admin | Updated: September 28, 2014 17:44 IST

कुस्तीपटू योगेश्वर दत्तच्या 'गोल्डन' पंचमुळे भारताने आशियाई स्पर्धेत रविवारी सुवर्ण चौकार मारला आहे.

ऑनलाइन लोकमत

इंचियोन, दि. २८ - कुस्तीपटू योगेश्वर दत्तच्या 'गोल्डन' पंचमुळे भारताने आशियाई स्पर्धेत रविवारी सुवर्ण चौकार मारला आहे. कुस्तीमध्ये (फ्री स्टाईल ६५ किलो गट)  योगेश्वरने ताजीकिस्तानच्या जालीम खानवर मात करत भारताला स्पर्धेतील चौथे सुवर्ण पदक मिळवून दिले. आशियाई स्पर्धेत तब्बल २८ वर्षांनी भारताला कुस्तीमध्ये सुवर्ण पदक मिळाले आहे. या चमकदार कामगिरीमुळे पदकतालिकेत भारत ४ सुवर्ण, ५ रौप्य व २६ कांस्य पदकांसह ८ व्या स्थानावर पोहोचला आहे. 
रविवारी भारतीय खेळाडूंमध्ये आशियाई स्पर्धेत पदकांची लयलूट करत भारताला १३ व्या स्थानावरुन थेट आठव्या स्थानावर आणले. यामध्ये मोलाचा हातभार लावला तो कुस्तीपटू योगेश्वर दत्तने. आशियाई स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताला तब्बल २८ वर्षांनी योगेश्वरने भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. कुस्तीपटू सुशीलकुमारच्या अनुपस्थितीत भारतीय क्रीडा प्रेमींना योगेश्वरकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. योगेश्वरने त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवत ताजीकिस्तानच्या कुस्तीपटूला धूळ चारुन भारताला सुवर्णपदक जिंकवून दिले. 
 
आज दिवसभरात भारताला मिळालेली पदकं
 
> धावपटू राजीव अरोकियाला ४०० मीटरच्या स्पर्धेत कांस्य पदक
> हॅमर थ्रोमध्ये मंजू बालाला कांस्यपदक.
> टेनिस पुरुष दुहेरीमध्ये दिविज शरण आणि युकी भांबरीला कांस्य पदक
> टेनिसमध्ये महिला दुहेरीत भारताच्या सानिया मिर्झा व प्रार्थना ठोंबरे या जोडीने कांस्य पदक पटकावले.
> भारताच्या युकी भांबरीने टेनिसमध्ये (पुरुष एकेरी) कांस्य पदक पटकावले
> महिला धावपटू खुशवीर कौरने २० किमी रेस वॉकमध्ये रौप्य पदक पटकावले