शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
5
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
6
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
7
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
8
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
9
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
10
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
11
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
12
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
13
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
14
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
15
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
16
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
17
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
18
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
19
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
20
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएलमध्ये भारताचे सर्वांत यशस्वी पाच कर्णधार

By admin | Updated: May 3, 2016 03:51 IST

आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व भारतीय खेळाडूनेच करावे, हेच योग्य आहे. काहींचे मत असे आहे, की सर्वांत योग्य व्यक्तीकडे संघाचे नेतृत्व सोपवायला पाहिजे, मग तो खेळाडू कुठल्याही

- एबी डिव्हिलियर्स लिहितो़..आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व भारतीय खेळाडूनेच करावे, हेच योग्य आहे. काहींचे मत असे आहे, की सर्वांत योग्य व्यक्तीकडे संघाचे नेतृत्व सोपवायला पाहिजे, मग तो खेळाडू कुठल्याही देशाचा असला तरी हरकत नाही. काहींच्या मते ही जबाबदारी भारतीय खेळाडूंवरच सोपवायला पाहिजे. कारण भारतीय खेळाडू संघाला योग्य पद्धतीने प्रोत्साहित करू शकतो. त्याचप्रमाणे त्याला वेगवेगळ्या मैदानांवरील परिस्थितीची चांगली माहिती असते. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने एक महत्त्वाचा निर्णय घेताना संघाचा यशस्वी फलंदाज डेव्हिड मिलरची कर्णधारपदावरून उचलबांगडी करीत मुरली विजयकडे ही जबाबदारी सोपविली. मुरली विजय तमिळनाडूचा कर्णधार म्हणून यशस्वी ठरला आहे. दरम्यान, जर परिस्थिती नियंत्रणात असेल तर स्पर्धेत एकच कर्णधार कायम ठेवण्यात येतो. आयपीएलच्या इतिहासात पाच सर्वांत यशस्वी कर्णधारांची चर्चा केली तर ते सर्व भारतीय आहेत. किमान १५ सामन्यांमध्ये आपल्या संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या कर्णधारांच्या विजयाच्या टक्केवारीवर आधार घेतला तर गौतम गंभीर पाचव्या स्थानी आहे. दिल्ली व कोलकाता संघांचा कर्णधार म्हणून ९३ सामने खेळताना त्याची विजयाची टक्केवारी ५५.७ अशी आहे. अनिल कुंबळे या यादीत चौथ्या स्थानी आहे. त्याने आरसीबीतर्फे २६ सामन्यांत संघाचे नेतृत्व केले. त्याची विजयाची टक्केवारी आहे ५७.६९ टक्के. महेंद्रसिंह धोनीने चेन्नई व पुणे संघाचे १३९ सामन्यांत नेतृत्व केले असून त्याची विजयाची टक्केवारी आहे ५९.०९ टक्के. तो तिसऱ्या स्थानी आहे. सचिन तेंडुलकरने २००८ ते २०११ या कालावधीत ५१ सामन्यांत मुंबई संघाचे कर्णधारपद भूषवले. त्याची विजयाची टक्केवारी आहे ६०.७८ आणि तो यादीत दुसऱ्या स्थानी आहे. आकडेवारीचा विचार करता आयपीएलच्या इतिहासात सर्वांत यशस्वी कर्णधार रोहित शर्मा आहे. रोहितने २०१३ ते २०१५ या कालावधीत ४४ सामन्यांत मुंबई संघाचे नेतृत्व केले. त्यात २७ सामन्यांत विजय मिळवला, तर १७ सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. त्याची विजयाची टक्केवारी ६१.३६ अशी आहे. आयपीएलमध्ये सर्वांत यशस्वी विदेशी कर्णधाराची चर्चा केली तर अव्वल स्थानी आहे शेन वॉर्न. महान आॅस्ट्रेलियन फिरकीपटूने पहिल्या चार सत्रांत राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद भूषवले आणि आपल्या नेतृत्वाखाली संघाला ५५ पैकी ३० सामन्यांत विजय मिळवून दिला. त्याची विजयाची टक्केवारी आहे ५४.५४ अशी. नेतृत्व कुणाकडे असावे? या प्रश्नाचे माझ्या मते काही योग्य उत्तर सापडत नाही. कारण नेतृत्व हे कुणा एका खेळाडूपेक्षा संघासोबत जुळलेली बाब आहे. आयपीएल संघाचे नेतृत्व करणाऱ्या विदेशी खेळाडूला स्थानिक खेळाडूचे सहकार्य व समर्थन मिळणे आवश्यक ठरते. एखादा भारतीय खेळाडू जर संघाचे नेतृत्व करीत असेल तर त्यालाही विदेशी खेळाडूच्या अनुभवाचा लाभ मिळत असतो. त्यामुळे या स्पर्धेत कर्णधार कुठल्याही देशाचा असला तरी अडचणीच्या स्थितीत संयम ढळू न देणे महत्त्वाचे आहे. (टीसीएम)