शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

विजयी प्रारंभ करण्याचा भारताचा निर्धार

By admin | Updated: October 7, 2014 03:07 IST

भारतीय संघ कोचीतील नेहरू स्टेडियममध्ये कामगिरीत सातत्य राखताना वेस्ट इंडीजविरुद्ध बुधवारी खेळल्या जाणाऱ्या पहिल्या वन-डे विजयाची हॅट्रिक नोंदविण्याच्या निर्धाराने उतरणार आहे

कोची : भारतीय संघ कोचीतील नेहरू स्टेडियममध्ये कामगिरीत सातत्य राखताना वेस्ट इंडीजविरुद्ध बुधवारी खेळल्या जाणाऱ्या पहिल्या वन-डे विजयाची हॅट्रिक नोंदविण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. कोचीतील नेहरू स्टेडियम कलूर आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या नावाने ओळखल्या जाते. जवळजवळ ६० हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये १ एप्रिल १९९८ मध्ये भारत आणि आॅस्ट्रेलिया संघांदरम्यान पहिला वन-डे आंतरराष्ट्रीय सामना खेळल्या गेला. तेव्हापासून आजतागायत या स्टेडियममध्ये ९ सामने खेळल्या गेले असून त्यात भारताने ६ सामन्यांत विजय मिळविला तर दोन सामन्यांत यजमान संघाला पराभव स्वीकारावा लागला. एक सामना रद्द झाला. भारताचा या मैदानावरील १० वा तर विंडीजविरुद्धचा दुसरा सामना खेळल्या जाणार आहे. कॅरेबियन संघाविरुद्ध भारताची यापूर्वीची लढत गेल्या वर्षी २१ नोव्हेंबर रोजी झाली होती. त्यावेळी टीम इंडियाने विराट कोहलीच्या ८६ धावांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर विजयाला गवसणी घातली होती. वेस्ट इंडिजने ४८.५ षटकांत २११ धावांची मजल मारली होती तर लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ३५.२ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात विजय साकारला. विराटच्या ८६ धावांच्या खेळी व्यतिरिक्त रोहित शर्माने शानदार ७२ धावांची खेळी केली होती. अष्टपैलू रवींद्र जडेजा व कामचलावू फिरकीपटू सुरेश रैनाने प्रत्येकी ३ बळी घेतले होते. तीन सामन्यांच्या मालिकेतील ही पहिली लढत होती. भारताने सलामी लढतीत विजय मिळवित मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. गेल्या वर्षी कोचीमध्ये भारताने इंग्लंडचा १५ जानेवारी रोजी १२७ धावांनी पराभव केला होता. बुधवारी विंडीजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत यजमान भारताने विजय मिळविला तर मालिकेत आघाडी घेण्यासह यजमान संघ या मैदानावर विजयाची हॅट््ट्रिक पूर्ण करणार आहे. कोचीमध्ये माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविडने पाच सामन्यांत २२३ धावा फटकाविल्या आहेत. द्रविड या मैदानावर सर्वाधिक धावा फटकाविणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर आहे तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (४ सामन्यात १० बळी) सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. कर्णधार धोनीने या मैदानावर १५६ तर विराटने २ सामन्यात १२३ धावा फटकाविल्या आहेत. जडेजाने २ सामन्यात ५ बळी घेतले आहेत. उभय देशांदरम्यान आजतागायत ११२ वन-डे सामने खेळल्या गेल्या असून त्यात भारताने ५० तर विंडीजने ५९ सामन्यांत विजय मिळविला आहे. एक सामना टाय संपला तर दोन सामन्यांत निकाल शक्य झाला नाही. (वृत्तसंस्था)