भारतीय गोलंदाजांनी स्वतःवर विश्वास ठेवावा - अनिल कुंबळे

By Admin | Updated: June 29, 2016 18:38 IST2016-06-29T18:38:23+5:302016-06-29T18:38:23+5:30

मला भारताच्या प्रत्येक गोलंदाजाला जगातील आघाडीचा गोलंदाज झालेले बघायचे आहे. भारतीय गोलंदाजांनी स्वतःला कधीच कमी समजू नये.

Indian bowlers should believe in themselves - Anil Kumble | भारतीय गोलंदाजांनी स्वतःवर विश्वास ठेवावा - अनिल कुंबळे

भारतीय गोलंदाजांनी स्वतःवर विश्वास ठेवावा - अनिल कुंबळे

>ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. २६ - मला भारताच्या प्रत्येक गोलंदाजाला जगातील आघाडीचा गोलंदाज झालेले बघायचे आहे. भारतीय गोलंदाजांनी स्वतःला कधीच कमी समजू नये. भारतीय गोलंदाजीत जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यात आहे अशा शब्दांत भारताचे नवे क्रिकेट प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी भारतीय गोलंदाजांना प्रोत्साहन दिले व आपल्यातील नेतृत्वगुणांची चुणुक दाखवून दिली. प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर प्रथमच त्यांनी वेस्ट इंडिज दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंशी चर्चा केली.
सद्यस्थितीत मी भारताच्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रीत करणार आहे. संघाला एक आकार घेताना मी बघेन. गोलंदाजांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करुन त्यांची काय गरज आहे ते समजून घेईन. गोलंदाजी असे क्षेत्र आहे जिथे मी खेळाडूंची चांगल्या प्रकारे मदत करु शकतो. भारतीय गोलंदाजांनी स्वतःवर विश्वास ठेवावा. त्यांनी कुठल्याही परिस्थितीत स्वतःला कमी समजू नये. या शब्दांत त्याने भारतीय खेळाडूंना मार्गदर्शन केले.
 

Web Title: Indian bowlers should believe in themselves - Anil Kumble